रेडमी नोट 10 एस स्टारलाईट पर्पल मोबाईलची किंमत आणि उपलब्धता अॅमेझॉन इंडिया अॅपवर देखील दिसून आली आहे. येथे सांगण्यात आलं आहे की, रेडमी नोट 10 एस स्टारलाईट पर्पल उद्या म्हणजेच 18 ऑगस्ट रोजी 14,999 रुपयांच्या लॉंचिंग किंमतीसह उपलब्ध होईल.
Painting the cosmo in a royal hue the Redmi way!💜
— Redmi India - #RedmiBook Super Start Life (@RedmiIndia) August 16, 2021
Watch this space for more!👀 ➡️ 🏆 pic.twitter.com/TOmU6q5pe7
Redmi Note 10S चे Specifications
Xiaomi Redmi Note 10S हा स्मार्टफोन 2.05Ghz ऑक्टा-कोर मीडियाटेक हेलिओ G95 प्रोसेसरसह आर्म मेल- G76 MC4 GPU सोबत येणार आहे. Redmi Note 10S मध्ये 6GB रॅम आणि 128GB पर्यंत UFS 2.2 स्टोरेज देण्यात आली आहे.
Redmi Note 10S या स्मार्टफोनमध्ये 6.43-इंचाचा AMOLED FHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 2400x1080p रिझोल्यूशन आणि 20: 9 आस्पेक्ट रेशियो देतो आहे. तर यात पुढच्या बाजूला कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 चा प्रोटेक्शन आहे आणि 4,500,000: 1, DCI-P3 कलर gamut आणि 1100 निट्स पीक ब्राइटनेसचे कॉन्ट्रास्ट रेशो मिळणार आहे. हे डिव्हाइस रीडिंग मोड 3.0 आणि सनलाइट डिस्प्ले 2.0 या सारख्या वैशिष्ट्यांसोबत येते.
बॅटरी
या स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी मिळणार आहे Redmi Note 10S हा स्मार्टफोन 33W फास्ट चार्ज सपोर्ट देतो आणि सोबत 33W फास्ट चार्जर सुद्धा या मोबाईल सोबत मिळणार आहे.
Redmi Note 10S चा कॅमेरा
फोटोग्राफीसाठी, Redmi Note 10S च्या रियर साईडला क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आले आहे. यातला प्रायमरी सेन्सर 64 MP चा लेंस (f/1.79 अपर्चर) आहे. तर दुसरा 8MP अल्ट्रा-वाइड-अँगल कॅमेरा (f/2.2 अपर्चर) सोबत 2MP मॅक्रो कॅमेरा (f/2.4 अपर्चर) आणि 2MP डेप्थ सेन्सर (f/2.4 अपर्चर) सेन्सर मिळणार आहेत. सेल्फीसाठी पंच-होल डिझाइनमध्ये 13 MP सिंगल कॅमेरा लेन्स (f/2.45 अपर्चर) देण्यात आला आहे.
रेडमी नोट 10 एस हा फोन लॉन्चच्या वेळी, 3 रंगाच्या पर्यायांत उपलब्ध केले गेले - ओशन ब्लू, गोमेद ग्रे, पेबल व्हाईट.
अशाच महत्वाचे अपडेट साठी जीवन मराठीला फॉलो आणि लाईक करायला विसरु नका.
ही पोस्ट नक्की आपल्या मित्रांसोबत शेअर करा.


