Amazon

Ads Area

header ads
header ads

प्रयोग मराठी व्याकरण | Prayog - Marathi Grammar

वाक्यात कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग आणि वचनाप्रमाणे क्रियापदाच्या रूपाची रचना आणि योजना असते, त्यास प्रयोग असे म्हणतात.
कर्ता आणि क्रियापद हे प्रत्येक वाक्य मध्ये महत्त्वाचे दोन घटक आहेत.
काही वेळेला वाक्यामध्ये कर्म येते. 

प्रयोगाचे मुख्य तीन प्रकार पडतात.

- कर्तरी प्रयोग
- कर्मणी प्रयोग
- भावे प्रयोग

वरील तीन मुख्य प्रकारांविषयी आता संपूर्ण माहिती आपण बघूया:

कर्तरी प्रयोग (Kartari Prayog):

कर्तरी प्रयोगामध्ये वाक्यातील क्रियापद कर्त्याच्या लिंग, वचन आणि पुरुषाप्रमाणे बदलत असते. 

उदाहरण:

तो आंबा खातो.
ती आंबा खाते.
ते आंबा खातात.
तू आंबा खातोस.

वरचे वाक्य अभ्यासला असताना आपल्याला असे लक्षात येते 'तो आंबा खातो' या वाक्यामध्ये खातो हे क्रियापद कर्त्याच्या लिंग वचन आणि पुरुष याप्रमाणे बदलले आहे. म्हणजेच क्रियापद कर्त्याच्या तंत्राप्रमाणे चालत आहे अथवा कर्त्याच्या क्रियापदाच्या रूपावर अधिकार आहे.

कर्तरी प्रयोगाचे दोन उपप्रकार आहेत.

सकर्मक कर्तरी प्रयोग

वाक्यामध्ये वाक्याचा अर्थ पूर्ण होण्यासाठी ज्यावेळी कर्माची आवश्यकता भासते त्यावेळेस सकर्मक कर्तरी प्रयोग होतो. सकर्मक कर्तरी प्रयोगामध्ये क्रियापद हे सकर्मक असते.

उदाहरण: 
तो सरबत पितो. 
तो - कर्ता, सरबत - कर्म, पितो - क्रियापद

ते पेढा खातात.
ते - कर्ता, पेढा - कर्म, खातात - क्रियापद

अकर्मक कर्तरी प्रयोग

अशा प्रकारच्या वाक्यामध्ये कर्माची आवश्यकता नसते. 

उदाहरण: 

ती झोपली.
तो पळाला.
मुले गातात.
लोक बसले.


कर्मणी प्रयोग:

कर्मणी प्रयोग हा महत्त्वाचा असून तो नेहमी प्रथमात येतो.

कर्ता हा तृतीयेत येतो. 
या प्रयोगामध्ये वाक्यामधील क्रियापद कर्माच्या लिंग वचन आणि पुरुषाप्रमाणे बदलत असते.
 
उदाहरण:
आकाशने साखर खाल्ली
सरिताने साखर खाल्ली.
त्यांनी साखर खाल्ली.

वरच्या वाक्यामध्ये अभ्यासले असताना आपल्याला असे लक्षात येते की, करता जरी बदलला तरी क्रियापदावर काहीही परिणाम होत नाही. म्हणजेच क्रियापद कर्त्याच्या लिंग, वचन व पुरुषाप्रमाणे बदलले नाही. 

आकाशने आंबा खाल्ला.
सरिताने आंबा खाल्ला.
त्यांनी आंबा खाल्ला.

आता वरील उदाहरणांमध्ये कर्म बदलले असता क्रियापदात देखील बदल होतो. म्हणजेच 'आकाशने साखर खाल्ली' या वाक्यात साखर हे स्त्रीलिंगी कर्म आहे. तर 'आकाशने आंबा खाल्ला.' यामधील कर्म हे पुल्लिंगी आहे. 

म्हणजेच कर्मणी प्रयोगामध्ये क्रियापद कर्माच्या तंत्राप्रमाणे चालत आहे म्हणजेच क्रियापदाच्या रूपावर कर्माचा अधिकार असल्याचं दिसून येतं.

कर्मणी प्रयोगाचे प्रकार:

प्रधान कर्तृक कर्मणी: 

या प्रकारच्या वाक्यामध्ये कर्त्याला महत्त्व असते. 
उदा: मुलांनी आंबे खाल्ले. 

शक्य कर्मणी: मुलांना आता टेकडी चढवतो. 

प्राचीन किंवा पुराण कर्मणी प्रयोग:

या प्रकारात वाक्य प्राचीन काव्य मधील असतात. 
यामध्ये सकर्मक क्रियापदे असून त्याला ' ज ' हा धातू प्रत्यय लावलेले असतात.

उदाहरण:
ब्राम्हणे विद्यार्थ्यास म्हणीजेले.
नले इंद्रासी असे बोलिजेले. 

समापन कर्मणी: 

अशा प्रकारच्या वाक्य करता षष्ठीत येतो. क्रियापदाचा अर्थ क्रिया समाप्त झाली असा होतो. 

उदाहरण: 
त्यांच्याकडून गोष्ट सांगून झाले.
त्याचा आंबा खाऊन झाला.
तिचे पुस्तक वाचून पूर्ण झाले.

नवीन कर्मणी (कर्मकर्तरी प्रयोग):

या कर्मणी प्रयोगामध्ये कर्त्याला ' कडून ' हे शब्दयोगी अवयव जोडून इंग्रजी भाषेप्रमाणे रचना करण्यात येते.

उदाहरण: 
रामाकडून रावण मारला गेला.
शिपायांकडून चोर पकडला गेला.
राशन दुकानदाराकडून दिले गेले.

भावे प्रयोग:

भावे प्रयोगामध्ये कर्ता किंवा कर्म गौण असते. तर क्रियापद हे स्वतंत्र तृतीय पुरुषी, नपुसकलिंगी, आणि एक वचनी असते. 

भावे प्रयोगामध्ये कर्त्याला तृतीयाचा तर कर्माला चतुर्थी किंवा तृतीयाचा प्रत्यय लागतो. 

म्हणजेच अशा प्रयोगाच्या वाक्यातील क्रियापदाचे रूप हे कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग किंवा वचन किंवा पुरुषाप्रमाणे बदलत नाही.

उदाहरण:

त्याने वाघाला ठार केले.
तिने वाघाला ठार केले.
त्यांनी वाघाला ठार केले.

वरच्या वाक्यांमध्ये कर्त्याच्या लिंगामध्ये बदल झाला आहे तरी देखील क्रियापदावर कोणताही परिणाम झाला नसून ते तृतीय पुरुषी, नपुसकलिंगी आणि एक वचनी राहिले आहे. 

त्याने वाघिणीला ठार केले.
तिने वाघिणीला ठार केले.
त्यांनी वाघिणीला ठार केले.

वरच्या वाक्यांमध्ये कर्ता आणि कर्म या दोन्हीच्या लिंगामध्ये बदल झालेला आहे तरी देखील क्रियापदावर कोणताच परिणाम झाला नाही. 

सकर्मक भावे प्रयोग:

सकर्मक भावे प्रयोगामध्ये क्रियापद सकर्मक असते. 

उदाहरण: 
कृष्णाने कंसास ठार मारले.

अकर्मक भावे प्रयोग: 

अकर्मक भावे प्रयोगामध्ये क्रियापद अकर्मक असते.
उदाहरण:
तिला मळमळते.
सर्वांनी शांत बसावे.


हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads