Amazon

Ads Area

header ads
header ads

भारताविषयी महत्वाचे फॅक्टस | TAIT 2023 | IMP Notes PDF

आत्तापर्यंत आपण भारताचा अक्षवृत्तीय रेखावृत्तीय विस्तार क्षेत्रफळ आणि विस्तार आणि भारताचे प्रशासकीय विभाग यांच्या बद्दलची माहिती घेतली ही माहिती शिक्षक अभियोग्यता परीक्षा आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा(TAIT) यासाठी खूप महत्त्वाची आहे.
आता अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा (TAIT exam Notes) याबद्दल महत्त्वाचे काही पॉईंट्स पाहूयात हे नोट्स आपल्याला अभ्यासल्यानंतर टी ए आय टी परीक्षा देत असताना खूप उपयोगी येणार आहेत.

📌 भारत 15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र झाला. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताने आपलं स्वतःचं संविधान निर्माण केलं. त्यामुळे भारत हे जगातील सर्वात मोठे प्रजासत्ताक म्हणजेच लोकशाही राष्ट्र आहे.

📌 भारत देशाच्या दक्षिण बाजूला हिंदी महासागर आहे.

📌 भारताला हिंदुस्तान हे नाव सिंधू या नदीमुळे मिळालेले आहे.

📌 पर्शिया या देशांमधून आलेले पर्शियन लोक भारतीयांना हिंदू म्हणत असत.

📌 भारत आणि इंडिया ही नावे भारतीय राज्यघटनेनुसार निश्चित करण्यात आली आहेत.

📌 भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी आहे.
📌 भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ आहे.
📌 भारताचा राष्ट्रीय फूल कमळ आहे.
📌भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर आहे.
📌 तर भारताचे राष्ट्रीय वृक्ष वड हे आहे.
📌 भारताचा राष्ट्रीय जलचर डॉल्फिन हे आहे.
📌 भारताचे राष्ट्रीय नदी गंगा नदी आहे.
📌 भारताचा राष्ट्रीय विरासत प्राणी हत्ती हा आहे.

📌 कर्कवृत्त हे भारतामधील आठ राज्यांमधून गेले आहे.

📌 रशिया, कॅनडा, चीन, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, ब्राझील, ऑस्ट्रेलिया हे जगातील 6 देश भारतापेक्षा मोठी आहेत.

📌 क्षेत्रफळाच्या दृष्टीने वरील देशांच्या नंतर भारताचा सातवा क्रमांक लागतो.

📌 भारत देशाला तिन्ही बाजूला सीमा असणाऱ्या नेपाळ, भूटान आणि बांगलादेश या देशांचा समावेश होतो.

📌 भारतातील पूर्व किनारपट्टीला लागून चार राज्यांची सीमा आहे. तर पश्चिम किनारपट्टीला लागून पाच राज्यांची सीमा आहे. या राज्यांच्या समुद्राला लागून सीमा असल्यामुळे तेथे समुद्रावर अवलंबून असणारे उद्योग आणि व्यवसाय विकसित झाले आहेत.

📌 भारतातल्या पाच केंद्रशासित क्षेत्रांना अरबी समुद्राची सीमा लाभलेली आहे.

📌 पाल्कची सामुद्रधुनी आणि मानारचे आखात यामुळे श्रीलंका हा देश वेगळा झाला आहे.

📌 आंध्रप्रदेश हा राज्य भाषावर प्रांतरचनेनुसार निर्माण झालेला पहिला राज्य आहे.

📌 2 जून 2014 रोजी तेलंगणा हे राज्य आंध्र प्रदेश या राज्यांमधून वेगळे करण्यात आले.

📌 1 नोव्हेंबर 2000 रोजी मध्यप्रदेश मधून निर्माण झालेले छत्तीसगड हे राज्य आहे.

📌 त्यानंतर लगेचच 9 नोव्हेंबर 2000 रोजी उत्तर प्रदेश या राज्यातून उत्तरखंड हे राज्य निर्माण करण्यात आले आहे.

📌 त्यानंतर तीन दिवसांनी म्हणजेच 11 नोव्हेंबर 2000 रोजी बिहार या राज्यांमधून झारखंड हे राज्य निर्माण केले गेले.

📌 भारताची प्रमाण वेळ 1905 पासून 82° 30" पूर्व रेखावृत्तावरून मानली जाते.

📌 श्रीलंका व भारत या देशाची प्रमाण वेळ एकच आहे.

📌 भारताच्या ईशान्य भागात असलेल्या राज्यांना सात सिस्टर असे म्हटले जाते.

📌 भारत आणि युरोप खंड यांच्यामधील अंतर सुवेज कालव्यामुळे 7 हजार किलोमीटर कमी झाले. हा सुवेझ कालवा 1869 मध्ये निर्माण करण्यात आला होता.

📌 2004 च्या त्सुनामीमध्ये निकोबार बेटांवरील भारताचे दक्षिणेकडील शेवटचे टोक असलेले इंदिरा पॉईंट हा भाग जलमग्न झाला आहे.

📌 भारताच्या शेजारी असलेले मालदीव हा देश जगातील सर्वात लहान राष्ट्र असून भारताच्या उत्तरेच्या बाजूला असलेला चीन हा सर्वात मोठा राष्ट्र आहे.

Shikshak abhiyogyata va buddhimata chachani

शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेसाठी लागणारे भारताच्या भूगोलाविषयी महत्त्वाचे काही मुद्दे या पेजवर आपण पाहिले.

याआधी आपण भारताच्या अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय विस्तारा विषयी माहिती घेतली होत ती वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

भारताचे क्षेत्रफळ व विस्तार याच्या विषयी माहिती घेतली होती ती वाचण्यासाठी येथे क्लिक करा

भारताच्या प्रशासकीय विभागा विषयी माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads