नागपुर येथे असलेल्या रेशीमबाग मधील राष्ट्रीय स्वयसेवक संघाचा विजयादशमी सोहळा सुरु झाला आहे.
यावेळी RSS चे सरसंघचालक मोहन भागवत यांनी शस्त्रपूजन केले असून पथसंचलनही झाले.
यावर्षी प्रथमच संघाच्या विजयादशमी सोहळ्यामध्ये महिलेला प्रमुख अतिथी म्हणून स्थान देण्यात आले आहे. मंचावर पद्मश्री संतोष यादव या उपस्थित आहेत.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेक नेते या सोहळ्यात उपस्थित आहेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना 27 सप्टेंबर इ.स. 1925 या वर्षी केशव बळीराम हेडगेवार यांनी त्यांच्या घरी केली आहे. या सघांच्या स्थापनेपासून अजूनही मुख्यालय नागपुर येथे आहे.
वनवासी क्षेत्रासाठी वनवासी कल्याण आश्रम, विद्यार्थी हितासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, महिला शाखा राष्ट्र सेविका समिती, पूर्वीचा जनसंघ आणि आत्ताचा भारतीय जनता पक्ष हा राजकीय पक्ष इत्यादी त्यांनी स्थापन केले आहेत.


