कोजागरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र हा पूर्ण अवस्थेमध्ये असतो तसेच पावसाळा झाल्यावर आकाश निरभ्र आणि स्वच्छ असते.
मिळालेल्या माहितीनुसार आणि आख्यायिकेनुसार या रात्री तांदूळ आणि दुधाची खीर एका धातूच्या भांड्यामध्ये स्वच्छ कापडाने बांधून ती चंद्राच्या प्रकाशामध्ये ठेवून देतात यामुळे चंद्राचा प्रकाश त्यावर पडून त्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
या कृती मागे वैज्ञानिक दृष्टिकोन असून त्या दृष्टिकोनानुसार लॅक्टिक ऍसिड हे दुधामध्ये पाहायला मिळते आणि त्यावर चंद्राच्या स्वच्छ किरण पडल्यावर त्या दुधामध्ये जंतुनाशक शक्ती प्रदान होते.
असे कोजागिरी पौर्णिमेच्या चंद्र प्रकाशामध्ये ठेवलेले दूध किंवा खीर खाल्ल्यानंतर दमा, श्वासांनाचा आजार किंवा त्वचारोग यामध्ये विशेष फायदा होतो.


