मागील भागामध्ये आपण भारताचा अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय विस्तार पाहिला त्यामध्ये इंदिरा पॉईंट या भारताच्या शेवटच्या टोकाबद्दल पाहिलं हे इंदिरा पॉईंट निकोबार बेट येथे असून हे भारताचे दक्षिणेकडील टोक आहे.
त्यानंतर भारताचा निम्मा भाग हा उष्णकटिबंधांमध्ये येतो. याचा देखील त्या नोट्समध्ये अभ्यास केला. त्यासोबत भारताची प्रमाण वेळ कोणत्या शहरावरून ठरवली जाते? याचा देखील अभ्यास आपण मागील नोट्स मध्ये केलेला आहे ते वाचण्यासाठी तुम्ही येथे क्लिक करून वाचू शकता. 👆भारताचा अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय विस्तार
भारताचे क्षेत्रफळ आणि विस्तार | Area and Extent of India
आता पण भारताचे क्षेत्रफळ आणि विस्तार याच्याबद्दल अभ्यास करूया. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा(TAIT exam 2023 Notes) या परीक्षेचा अभ्यास करत असताना भारताचे क्षेत्रफळ आणि विस्तार याबद्दलच्या या गोष्टी तुम्ही नक्कीच लक्षात ठेवल्या पाहिजेत.
📌 जगाच्या क्षेत्रफळाच्या 2.42% क्षेत्र भारताने व्यापले असून भारताचे एकूण क्षेत्रफळ 32, 87,263 चौरस किलोमीटर आहे.
भारताची भू सीमा Land border of India
📌 भारताची भू सीमा पाहिल्यास सगळ्यात जास्त भू सीमा बांगलादेश ला लागून आहे. तर सगळ्यात कमी भू सीमा ही अफगाणिस्तान देशाला लागून आहे.
📌 भारताची भू सीमा 15,200 किलोमीटर आहे.
📌 ड्यूरांड - पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या देशाला लागून असलेल्या सीमा रेषेला ड्यूरांड असं नाव आहे हे जम्मू आणि काश्मीर या राज्यांमध्ये आहे.
📌 रेडक्लिप - ही सीमारेषा भारत - पाकिस्तान यांच्यामध्ये आहे. तर ही सीमारेषा राजस्थान, गुजरात आणि जम्मू काश्मीर यांच्यामध्ये आहे
📌 मॅकमोहन - भारताच्या ईशान्य भागात असलेली म्हणजेच भारत आणि चीन या देशांमध्ये असलेली सीमारेषा याचं नाव मॅकमोहन आहे. ही सीमारेषा जम्मू काश्मीर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश या राज्यांमध्ये आढळते.
भारताची सागर सीमा Sea border of India
📌 भारताला 7,517.6 किलोमीटर एकूण लांबीचा सागर सीमा आहे.
📌 मुख्य भूमी बद्दल विचार केल्यास 6,100 किलोमीटर सागर सीमा भारताला लाभले आहे.
📌 गुजरात या भारतातील राज्याला सर्वाधिक समुद्रकिनारा लाभला आहे.
भारताची लांबी
📌भारताचे उत्तर दक्षिण लांबी 3200 किलोमीटर आहे.
📌 तर भारताची पूर्व पश्चिम लांबी 3000 किलोमीटर आहे.
📌 दफ्दार हे जम्मू कश्मीर राज्यातील ठिकाण हे भारताचे उत्तर टोक आहे.
📌 तर भारताचे शेवटचे दक्षिणेकडील टोक इंदिरा पॉईंट आहे. हे ठिकाण अंदमान निकोबार या बेटा मधील निकोबार बेटावर येते.
📌 कन्याकुमारी हे भारतीय द्वीपकल्पाचे दक्षिणेकडील टोक आहे.
📌 तर भारताचे पूर्वेकडील टोक हे अरुणाचल प्रदेशातील किबिधू या ठिकाणी येते.
📌तर पश्चिमेकडील टोक गुजरात राज्यात घूमर मोटटा या ठिकाणी आहे.
भारताच्या शेजारील देश
भारताच्या शेजारील देशाबद्दल बोलायचं झाल्यास नैऋत्येला मालदीव हा देश येतो. तर आग्नेय ला इंडोनेशिया हा देश आहे. दक्षिण बाजूला श्रीलंका हा देश असून उत्तर बाजूला चीन, नेपाळ, भूटान हे देश आहेत. पूर्व बाजूला म्यानमार म्हणजेच ब्रह्मदेश हा देश आहे. भारताच्या वायव्य बाजूला पाकिस्तान व अफगाणिस्तान हे देश आहेत.
शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेसाठी भारताच्या भूगोलाबद्दल अभ्यास करत असताना आपल्याला भारताच्या क्षेत्रफळाबद्दल आणि विस्ताराबद्दल ही माहिती खूप उपयोगी आहे.
ही माहिती आपल्या शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा (Maha TAIT2023) देणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत नक्की शेअर करा.
भारताच्या प्रशासकीय विभागाबद्दल माहिती घेण्यासाठी येथे क्लिक करा.
ही माहिती विविध संदर्भ पुस्तकांच्या आधारे आणि संकेतस्थळांचा उपयोग करून गोळा केलेली आहे कृपया यामध्ये काही त्रुटी असतील तर नक्की निदर्शनास आणून द्या.


