WhatsApp या मेसेजिंग ॲपमध्ये एक धोकादायक दोष (बग) आढळून आला आहे. यामुळ डेटा लीक होण्याचा धोका निर्माण झाला आहे. हा बग अँड्रॉईड आणि IOS या दोन्ही व्हर्जनमध्ये मालवेअर इन्स्टॉल करू शकतो.
व्हिडिओ कॉलद्वारे किंवा युझर्सना व्हिडिओ फाईल पाठवून हा मालवेअर व्हायरस इन्स्टॉल होऊ शकतो. बँकिंग सिस्टीमला सोव्हा अँड्रॉईड ट्रोजन व्हायरसचा धोका आहे. याद्वारे कोणत्याही मोबाईल बँकिंग सिस्टीमचा युझरनेम आणि पासवर्ड हॅक करता येऊ शकतो.


