Amazon

Ads Area

header ads
header ads

ज्येष्ठ समाजसेवक प्रकाश आमटेंना ब्लड कॅन्सर; दीनानाथ रुग्णालयामध्ये देत आहेत कॅन्सरसोबत झुंज

जेष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांनी त्यांचं संपुर्ण जीवन आदिवासीं लोकांच्या आयुष्यातील अंधार बाजूला करण्यासाठी व्यतीत केले. मात्र आता त्यांच्या आयुष्यामध्ये अंधार करणारी धक्कादायक बातमी समोर येत आहे.
डॉ.प्रकाश आमटे यांच्या आरोग्याबद्दल बातमी समोर येत असून त्यांना ‘हेअरी सेल ल्युकेमिया ब्लड कॅन्सर’ असल्याचे निदान झाले असल्याची माहिती मिळत आहे. सोबत न्यूमोनियाची सुद्धा लागण झाली होती. त्यामुळे मागच्या १० दिवसांपासून पुण्यातल्या दीनानाथ रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

‘हेअरी सेल ल्युकेमिया कॅन्सर म्हणजे काय?

‘हेअरी सेल ल्युकेमिया’ हा ‘ कॅन्सर’ क्रोनिक या प्रकारात मोडत असून रक्त आणि अस्थिमज्जाचा एक दुर्मिळ, हळूहळू वाढणारा कर्करोग आहे. आपल्या शरीरात असणाऱ्या बी पेशी (लिम्फोसाइट्स)वर हा कर्करोग परिणाम करतो.  पांढऱ्या पेशी आपल्या शरीरातील रोगजंतुशी लढतात. मात्र हेअरी सेल ल्युकेमिया झाल्यावर आपले शरीर असामान्य बी लिम्फोसाइट्सचे अतिरिक्त निर्मिती करते त्यामुळे या पेशी योग्यरित्या कार्य करत नाहीत. तर या कारणाने असामान्य पेशी निरोगी बी लिम्फोसाइट्सची जागा घेतात. परिणामी रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होऊन इतर संक्रमण होण्याची शक्यता निर्माण होते. 
म्हणजे अतिरिक्त निर्मितीमुळे रोग प्रतिकारक यंत्रणेत या पेशी तारक ऐवजी मारक ठरतात. या अतिरिक्त पांढऱ्या पेशी सूक्ष्मदर्शकाखाली केसासारख्या दिसून येतात म्हणून त्यांना हेअरी सेल ल्युकेमिया म्हटले जाते.

दिवंगत ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांच्या प्रेरणेमधून उभ्या असलेल्या लोकबिरादरी या प्रकल्पातून डॉ. प्रकाश आमटे, डॉ. मंदाकिनी आमटे यांच्यासह आमटे कुटुंबियांची सध्या चौथी पीढी आरोग्य, शिक्षण, शेती या कार्याच्या माध्यमातून आदिवासींना सेवा देत आहेत.
गडचिरोली जिल्ह्यात जंगलामध्ये अतिदुर्गम अशा भामरागडच्या हेमलकसा येथे ‘लोकबिरादरी’ प्रकल्पाच्या माध्यमातून लाखो आदिवासींच्या जीवनाला आधार काम आमटे कुटूंब करत आहेत.

Title : a-senior-social-worker prakash-amte-has-blood-cancer-at-dinanath-hospital
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या