सत्येंद्रनाथ बोस यांचा आज Google doodle ठेवत आजचा दिवस साजरा करत आहे. पण का ते जाणून घेऊ या लेखात;
Satyendra Nath Bose Biography
शास्त्रज्ञ सत्येंद्रनाथ बोस यांचा जन्म 1 जानेवारी 1894 ला कोलकाता येथे झाला होता. सत्येंद्र नाथ बोस यांचं शालेय शिक्षण पासून पदवी शिक्षण कोलकाता येथे झाले. ते नेहमीच प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होत असत. एकदा शाळेमध्ये त्यांना गणिताच्या एक्साम मध्ये 100 पैकी 110 गुण देण्यात आले होते. याच कारण त्यांनी सगळी गणिते वेगवेगळ्या पद्धतीने सोडवत ती अचूक सोडविली होती.
सत्येंद्र नाथ बोस यांना जगदीशचंद्र बोस व प्रफुल्लचंद्र रॉय यांचे मार्गदर्शन तसेच उत्तेजन मिळाले. सत्येंद्र नाथ बोस यांना अनेक भाषा येत होत्या सोबत ते व्हायोलीन सारखे असणारे एसराज नावाचे वाद्य उत्तमपणे वाजवु शकत असत.
मूळ जर्मन भाषेतील असणारा अल्बर्ट आईन्स्टाईन यांचा सापेक्षता सिद्धांत त्यांनी 1915 या वर्षी इंग्रजी भाषेत भाषंतरित केला.कोलकाता येथील विद्यापिठात प्राध्यापक म्हणून 1916 ते 1921 या काळात सत्येंद्र नाथ बोस यांनी काम केलं. 1921 या वर्षी ढाका येथल्या विद्यापिठात भौतिक शास्त्राचे प्राध्यापक म्हणून सत्येंद्र नाथ बोस यांनी काम सुरू केले.
भौतिकशास्त्र विषयाचे सत्येंद्रनाथ बोस यांनी 24 लेख लिहिले असून भौतिशास्त्रातील हे सर्व लेख अत्यंत महत्त्वाचे समजले जातात.
1958 या वर्षी सत्येंद्रनाथ बोस यांचं भारत सरकारने पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरव केला. रॉयल सोसयटी या लंडन येथील सोसायटीने त्यांना आपला सहकारी म्हणून 1958 ला जाहीर केले. 4 फेब्रुवारी 1974 ला सत्येंद्र नाथ बोस यांचं हृदय रोगामुळे निधन झाले.
Satyendra Nath Bose Google Doodle:
सत्येंद्र नाथ बोस गुगल डूडल:
आज Google ने ठेवलेले Doodle हे भारतीय भौतिकशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ सत्येंद्र नाथ बोस आणि बोस-आईनस्टाईन कंडेनसेटमधील त्यांचे योगदान साजरे करत आहे. सन 1924 मध्ये या दिवशी, सत्येंद्रनाथ यांनी अल्बर्ट आइनस्टाईन यांना त्यांची क्वांटम फॉर्म्युलेशन पाठवली ज्याला क्वांटम मेकॅनिक्समधील एक महत्त्वपूर्ण शोध म्हणून अल्बर्ट आईनस्टाईन यांनी लगेच ओळखले. 1917 च्या अखेरीस, बोस यांनी भौतिकशास्त्रावर व्याख्याने देण्यास सुरुवात केली.
फिलॉसॉफिकल मॅगझिन नावाच्या प्रमुख विज्ञान जर्नलला प्लॅंक लॉ अँड द हायपोथिसिस ऑफ लाईट क्वांटा नावाचा अहवाल पाठवला. मात्र त्यांच्याकडून अहवाल नाकारला गेला. त्यामुळे तो अहवाल सत्येंद्र नाथ बोस यांनी अल्बर्ट आइनस्टाईनला पाठवण्याचा धाडसी निर्णय घेतला. अल्बर्ट आइन्स्टाईन यांना या शोधाचे महत्त्व कळले त्यामुळे त्यांनी बोस यांचे सूत्र विविध प्रकारच्या घटनांवर लागू केले. सत्येंद्र नाथ बोस यांचा सैद्धांतिक पेपर क्वांटम सिद्धांतातील सर्वात महत्त्वाचा शोध ठरला आहे.
भौतिकशास्त्राच्या जगामध्ये क्रांती घडवल्याबद्दल सत्येंद्र नाथ बोस यांचे जीवन मराठी कडून खूप आभार.


