आज काय घडलं? What happened today? Top Headlines Big Stories 28 June
Jeevan Marathi१४ जून
0
आज काय घडलं?What happened today? या प्रत्येक दिवशी लिहल्या जाणाऱ्या पेज मार्फत आम्ही आपल्यालाआज काय नेमक्या घडामोडी घडल्या हे सांगण्याचा प्रयत्न करतो. आज या पेजचा पहिला अंक आहे.
What Happened Today? 28 June 2022
ह्या अंकात आम्ही आपल्यासोबत 28 जून रोजी काय काय टॉप हेडलाईन्स घडल्या याबाबत थोडक्यात माहिती देणार आहोत.
28 जून 2022
'डान्स इंडिया डान्स लिटिल मास्टर्स' या डान्स शोच्या पाचव्या हंगामात आसामच्या 9 वर्षीय नोबोजित नारजारीने बाजी मारली आहे. त्याला 10 लाख रुपये रोख रक्कम बक्षीस स्वरुपात मिळाली आहे.
17 जून 2022
दहावीचा निकाल कसा पाहायचा? या स्टेप्स करा फॉलो...
🚙 बेशिस्त वाहन दाखवा, 500 रुपये कमवा..!
🗣️ नितीन गडकरींची अनोखी 'स्कीम'..!
वाहनचालकांना शिस्त लागावी, यासाठी केंद्रिय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी अनोखी शक्कल लढवली आहे.. वाहतूक नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी वाहतूक पोलिस तर उभा करणं शक्य नाही, ही बाब ओळखून मंत्री गडकरी यांनी लोकांनाच खास आवाहन केलं..
दिशाभूल करणाऱ्या जाहीरातींनंतर आता सेलिब्रिटींसाठीही मार्गदर्शक तत्त्वे जारी
11 जून 2022
🙇♂️लालबागचा राजाचा पाद्यपूजन सोहळा पडला पार
आता कोविड निर्बंध हटवल्यामुळे यंदाच्या गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होणार आहे. गणेशभक्तांचं आराध्य दैवत बनलेल्या लालबागच्या राजाचा (Lalbaugcha Raja) आज पाद्य पूजन सोहळा पार पडला.
🩺4 हात पायांच्या चिमुकलीवर शस्त्रक्रिया
सोनू सूदने बिहारमधल्या चौमुखी कुमारी या चिमुकल्या मुलीची मोठी मदत केली आहे.
चौमुखीचा जन्म झाला तेव्हा तिला चार पाय आणि चार हात होते. तिच्या शस्त्रक्रियेसाठी सोनूने मदत केली असून सोशल मीडियाद्वारे त्याने याबद्दलची माहिती दिली.
सोनूने चौमुखीसोबतचा फोटोसुद्धा पोस्ट केला आहे. आता चौमुखी इतरांप्रमाणे सर्वसामान्य मुलीचं आयुष्य जगू शकेल. #SonuSood #chaumukhikumari
10 जून 2022
राज्यसभा निवडणूकीसाठी आज मतदान तर संध्याकाळी 7 वाजता
राज्यसभा निवडणूकीसाठी आज मतदान होणार असून सकाळी 9 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत ही मतदान प्रक्रिया असणार आहे.
मतमोजणीस संध्या. 5 वाजेला सुरूवात होऊन संध्या 7 वाजेपर्यंत निकाल लागणार आहे.
विधानसभेचे 288 सदस्य आहेत मात्र 1 आमदाराचे निधन व 2 आमदार कोठडीमध्ये असल्यान एकूण 285 मतदार राज्यसभेच्या 6 जागांसाठी मतदान करणार आहेत.
पाकिस्तानी प्रसिद्ध टीव्ही होस्ट व खासदार आमिर लियाकत यांचे निधन
पाकिस्तानी टीव्ही क्षेत्रातील प्रसिद्ध सुत्रसंचालक आणि कराचीचे खासदार डॉक्टर आमिर लियाकत हुसैन यांचे निधन झाले आहे. ते 49 वर्षांचे होते. त्यांनी 18 वर्षाच्या मुलीसोबत नुकतेच तिसरे लग्न केल्यामुळे ते चर्चेत आले होते. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्षाचे ते सदस्य होते.
#AamirLiaquatHussain #AamirLiaquat
बस थांबवून कंडक्टरची दरीत उडी
कल्याण येथून निघालेली अकोले आगारामध्ये जात असलेली बस माळशेज घाटामध्ये आल्यावर वाहकाने बस थांबवत थेट दरीमध्ये उडी घेतल्याचा प्रकार घडला असून या वाहकाचे नाव गणपत इडे असे आहे.
सदर घटनेमध्ये एकच खळबळ उडाली असून याप्रकरणी टोकावडे पोलीस अधिक तपास करत आहेत.
#MarathiNews
😢गेमच्या नादापायी गमवला जीव
आईन मोबाइल गेम खेळण्यास विरोध केल्यान ओम भरत कथोरिया या 15 वर्षीय मुलाने रेल्वे रुळावर आत्महत्या केली असल्याची हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना मालाड येथे गुरुवारी घडली.
मुलाची सुसाईड नोट घरातील सदस्यांना सापडल्यावर त्यांनी मुलाचा शोध सुरू केला.
मुलाचा छिन्नविछिन्न मृतदेह कांदिवली मालाड रेल्वे ट्रॅकवर सापडला असून सदर घटनेमुळे शहरामध्ये खळबळ उडाली आहे.
उभ राहून पाणी पिताय का?
8 जून 2022
आपला 12 वीचा निकाल कसा चेक कराल?
हेडफोन्सवर गाणी ऐकता का? हे तुमच्यासाठी...
ज्येष्ठ वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचं निधन
4 जून 2022
जेष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!
#AshokSaraf #HappyBirthday
29 मे 2022
काँग्रेस नेते आणि पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांची मानसा जिल्ह्यात अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली.
#sidhumoosewala
महिलांसाठी ठाकरे सरकारचा सर्वात मोठा निर्णय, ग्रामविकास मंत्र्यांनी केली ‘ही’ घोषणा..!
☀️ सन मराठीवर 30 मे पासून नवी मराठी मालिका | 📺 माझी माणस | प्रमुख भूमिकेत जानकी पाठक
सन मराठी चॅनल एक वेगळ्या नातेसंबंधाची गोष्ट, 'माझी माणसं' या नव्या मालिकेतून दाखवणार आहे. येत्या ३० मे पासून सन मराठी चॅनेलवर Majhi Mansa ही मालिका पाहता येणार आहे.
लडाख येथे भारतीय जवानांना घेऊन जाणारी बस नदीत कोसळली, 7 जवान शहीद. भावपूर्ण श्रद्धांजली
लडाख येथे २६ जवानांना घेऊन जाणारे भारतीय लष्कराचे वाहन श्योक नदीत पडून अपघात झाला. या अपघातामध्ये सात जवानांचा मृत्यू झाला असून बरेच जवान जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. थॉईसपासून सुमारे २५ किमी अंतरावर हा अपघात झाला आहे.
#Instagram इंन्स्टाग्रामने अपडेट केला नवा लोगो, सोबत काही नव्या गोष्टी!
26 मे 2022
🫕 तळलेलं तेल पुन्हा वापरल्यास कारवाई होणार..
😱 शरीरासाठी ठरू शकतं विष..!
वाढत्या महागाईमुळे खाद्यतेलाचे दरही गगणाला भिडले आहेत. त्यामुळे पदार्थ तळण्यासाठी एकाच तेलाचा वारंवार वापर केला जातो.. तळलेलं तेल पुन्हा पुन्हा वापरल्याने त्याचा आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम होत असतो.. त्यामुळे अशा ठिकाणांवर आता अन्न व औषध प्रशासनाचा (FDA) ‘वॉच’ असणार आहे.
‘अॅमेझाॅन’वर गुलाबी रंगाची एक साधी प्लॅस्टिकची बादली विकण्यासाठी ठेवली आहे. बाजारात ही बादली फार तर 200 ते 300 रुपयांना मिळू शकते.. पण ‘अॅमेझाॅन’वर त्याची किंमत पाहून डोळे पांढरे होतील.
🪖सीमा सुरक्षा दलात कार्यरत असलेले जावळी तालुक्यातील बामणोली तर्फ कुडाळ, येथील जवान प्रथमेश संजय पवार वय 22 जम्मू-काश्मीर मध्ये कर्तव्य बजावत असताना रात्री साडेदहाच्या सुमारास अतिरेक्यांची चकमक होत असतानाच हुतात्मा झाले.
🥺अवघ्या तीन महिन्यापूर्वी भरती झालेले प्रथमेश संजय पवार हे देशासाठी शहीद झाले.
▶️समोरून दहशतवादी फायरिंग सुरू असतानाच प्रत्युत्तर देतानाच प्रथमेश जाधव यांना गोळी लागल्याने ते गंभीर जखमी झाले.
350 निमंत्रक असलेली पत्रिका व्हायरल
📜सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील एका कुटुंबातील मुलाच्या लग्नपत्रिकेत तब्बल साडेतीनशेवर निमंत्रकांची नावे छापली आहेत.
👪पत्रिकेत लग्नासाठी आमंत्रित करणाऱ्या ५६ नावांचा समावेश केला आहे, तर 300हून अधिक निमंत्रित पै-पाहुण्यांच्या नावांनी पत्रिका भरगच्च झाली आहे.
😁काहीजण लग्नपत्रिकेवरचा खर्च टाळण्यासाठी व्हॉट्सॲपचा उपयोग करतात. परंतु या वरपित्याने लग्नपत्रिकेत तब्बल साडेतीनशेवर निमंत्रकांची नावे छापली आहेत. त्याची सर्वत्र चर्चा होत आहे.
20 मे 2022
🏅भारताने इतिहास रचला, जिंकले सुवर्णपदक
🥊भारताच्या निखत जरीनने तुर्कीतील इस्तांबूल येथे सुरू असलेल्या वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप मध्ये सुवर्णपदक जिंकले.
⚖️हे सुवर्णपदक 52 किलो वजनी गटात जिंकले आहे. फ्लाईवेट फायनलमध्ये तिने थायलंडच्या जितपॉन्ग जुटामासवर मात केली.
📶वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारी मेरी कोम, सरिता देवी, जेनी आरएल आणि लेख केसी यांच्यानंतर ती पाचवी भारतीय महिला बॉक्सर ठरली.
(India's Nikhat Jareen wins gold at World Boxing Championships in Istanbul, Turkey)
🏏आऊट दिल्यावर मॅथ्यू वेड भडकला, ड्रेसिंग रूम मध्ये तोडफोड केली
🏌️IPLमध्ये आजच्या सामन्यात वाद निर्माण झाला असून खरे तर गुजरातचा मॅथ्यू त्याला आऊट दिल्याने इतका नाराज झाला होता की, त्याने ड्रेसिंग रूममध्ये जाऊन तोडफोड करण्यास सुरुवात केली.
🤾डावाच्या सहाव्या षटकात मॅक्सवेलच्या लेन्थ चेंडूवर वाईड स्वीप सुरू झाला, मात्र चेंडू थेट पॅडला लागला. मैदानी पंचांनी तो आऊट दिला. 😡डीआरएस घेऊनही तो बाहेर दिसत होता. या निर्णयामुळे तो संतापला होता. (Angry Matthew Wade Throws Away Helmet, Smashes Bat on Floor After Wrongly Given Out by TV Umpire)
📱मोबाईलबद्दल ‘या’ इंटरेस्टिंग गोष्टी तुम्हाला नक्कीच नसतील माहिती
🛬दिल्ली-शिर्डी विमानात तांत्रिक बिघाड, मुंबईमध्ये लँडिंग
✈️दिल्ली शिर्डी प्रवासादरम्यान स्पाईस जेटचे विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. या मुळे विमानाचे शिर्डी ऐवजी मुंबईत उशिरा लँडिंग करण्यात आली.
🛬विमानातील प्रवाशांना बसने शिर्डीला नेण्यात येणार आहे. यासाठी तांत्रिक बिघाड आणि खराब हवामानाचे कारण देण्यात आले आहे. (Technical failure on Delhi-Shirdi flight, landing in Mumbai)
🍝खाद्यतेल स्वस्त होणार, पाम तेलावरील बंदी उठली
🌴भारतात पाम तेलासह इतर खाद्यतेलाच्या किमतीत घट होण्याची शक्यता आहे. कारण इंडोनेशियाने 23 मे पासून पामतेल निर्यातीवरील बंदी उठवण्याचा निर्णय घेतला आहे.
🇮🇩इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोडो यांनी गुरुवारी ही घोषणा केली. इंडोनेशियाच्या खासदारांनी सरकारला निर्यात बंदीचा आढावा घेण्याचे आवाहन केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
📣 आता तुमच्या WhatsApp ग्रुप मध्ये मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि माहिती-मनोरंजन! त्यासाठी ग्रुप जॉईन करा 👉 click here to Add
💹एका दिवसात 6.36 लाख कोटी रुपयांचे नुकसान
📉शेअर बाजारात आज मोठी घसरण झाल्याने गुंतवणूकदारांचे तब्बल 6.36 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
🔻मार्च 2020 नंतर इन्ट्रा-डे मध्ये पहिल्यांदाच एवढी मोठी घसरण झाली आहे. आजच्या घसरणीनंतर शेअर बाजारातून तब्बल 6.36 लाख कोटी रुपये पाण्यात गेले आहेत.
💰त्यामुळे शेअर बाजारातील एकूण भांडवल हे 255.7 लाख कोटींवरून 249.40 लाख कोटी रुपयांवर आले आहे.
🎞️पॉर्न चित्रपट शिल्पा शेट्टीच्या पतीविरोधात पुन्हा गुन्हा दाखल
👫अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा पुन्हा अडचणीत आला आहे. पॉर्नोग्राफी केस प्रकरणात आता ईडीने त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
🚓मनी लाँड्रिंग कनेक्शनसंदर्भात ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी 2021 मध्ये राज कुंद्राविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्याला अटकही झाली होती.
🚶सध्या राज कुंद्रा जामीनावर आहे. त्याच्यावर अनेक गंभीर आरोप आहे.