Xiaomi : Redmi Note 10S हा नवीन स्वस्त स्मार्टफोन लॉन्च ! जबरदस्त स्पेसिफिकेशन्स आणि फिचर्स.. पहा किंमत.
sakshi pimpale
०३ डिसेंबर
जीवन मराठी:Redmi Note 10S Details : Xiaomi सध्या ग्राहकांच्या पसंतीस ठरलेली स्मार्टफोन कंपनीने नवीन एक स्मार्टफोन लॉन्च केला आहे.
या कंपनीने Redmi चा स्मार्टफोन ग्राहकांच्या भेटीस आणला आहे असो पॉकेट फ्रेंडली ठरला आहे त्याचप्रमाणे कंपनीने या स्मार्टफोनमध्ये अनेक अनोखे फिचर्स दिले आहेत. वेगवेगळ्या स्पशिफिकेशन्स युक्त हा फोन मार्केटमध्ये उपलब्ध होणार आहे. चला तर मग पाहूया या स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्स बद्दल..
Redmi Note 10S specifications :
या स्मार्टफोन मध्ये ६.४३ -इंचाचा सुपर अमोलेड डिस्प्ले आहे. जे २४०० x १०८० पिक्सेल रेसोल्युशन सह येतो . Android ११ वर आधारित MIUI १२.५ वर काम करतो.
Redmi Note 10S या स्मार्टफोनच्या बॅक पॅनल वर क्वाड-कॅमेरा सेटअप दिला आहे. ज्यामध्ये ६४- MP चा वाइड- अँगल कॅमेरा, ८ MP वाइड लेन्स, २-मेगापिक्सेल मॅक्रो लेन्स आणि २- MP डेप्थ सेन्सरचा प्रोव्हाइड केला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंग साठी १३ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. या स्मार्टफोनची वैशिष्ट्य म्हणजे ३३ W जलद चार्जिंगसह ५००० mAh बॅटरी देखील पॅक करते. रेडमी च्या या स्मार्टफोन इतर हायलाइट वैशिष्ट्यांमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर त्याच प्रमाणे ड्युअल स्पीकर, ३.५ मिमी हेडफोन जॅक, एआय फेस अनलॉक , पाणी आणि धूळ संरक्षणासाठी IP53 रेटिंगसह ड्युअल सिम कनेक्टिव्हिटी या सर्व सुविधााा देण्यात आले आहेेेेत.हा फोन MediaTek Helio G95 चिपसेटद्वारे समर्थित केला आहे.
रेडमी चा हा स्मार्टफोन ८ जीबी रॅम सह येईल ज्यामध्ये १२८ जीबी स्टोरेज दिला असेल.
Redmi Note 10S किंमत ( price) :
रेडमी ने लॉन्च केलेल्या या नवीन स्मार्टफोन ची किंमत १७,९९९ रुपये इतकी आहे. Redmi Note 10S त्याची विक्री ३ डिसेंबर दुपारी १२ वाचले पासून सुरु झाली आहे. हा स्मार्टफोन ॲमेझॉन( Amazon), फ्लिपकार्ट ( Flipkart) या वेबसाईटवर खरेदी करता येऊ शकते.