सॅमसंग गलेक्सि M42 5G मोबाईलमध्ये Qualcomm Snapdragon 750G 5G प्रोसेसर आहे. हा स्मार्टफोन2 व्हेरिएंट मध्ये येतो. ज्यामध्ये 6GB किंवा 8GB RAM असलेला फोन आपल्याला निवडता येतो तर इनबिल्ट स्टोरेज 128GB आहे. Galaxy M42 5G हा वन UI 3.1 आधारित असून यात Android 11 ऑपरेटिंग सिस्टीम आहे. या स्मार्टफोनमध्ये असलेली बॅटरी 5,000mAh battery असून ही जास्त वेळ टिकते. मात्र याच 15W चार्जिंग थोडस स्लो वाटत.
Samsungच्या या स्मार्टफोनमध्ये आपल्याला quad-camera सेटअप मिळतो जो दिवस प्रकाशात चांगले रंग आपल्या फोटोत देतो. जवळून काढलेले फोटो आपल्याला चांगले डिटेल्स देतात. मात्र कमी प्रकाशात काढलेले फोटो अव्हरेज येतात. नाईट मोड वापरल्यावर हळुवार इंप्रोव झालेलं दिसते.
28 एप्रिल 2021 रोजी हा फोन लॉन्च करण्यात आला आहे. फ्रंट कॅमेरा बद्दल बोलायचं तर यात 20 मेगापिक्सल असलेला कॅमेरा देण्यात आला आहे जो दिवसप्रकाशात चांगले फोटो काढायला मदत करतो.


