सध्या मिळालेल्या वृत्तानुसार, विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी, जसप्रीत बुमराह, रोहित शर्मा , सुनील नरीन, ग्लेन मॅक्सवेल तसेच आंद्रे रसेल या खेळाडूंची नावे फ्रांचायझींना सोपवण्यात आले आहेत.
माहितीनुसार पुढे दिलेली खेळाडूंची नावे त्यांच्या टीम प्रमाणे रिटेन यादीत नोंदवण्यात आली आहेत.
◾चेन्नई सुपर किंग्स ( Chennai super Kings) : ऋतुराज गायकवाड, रवींद्र जडेजा, मोईन आली, महेंद्रसिंग धोनी.
◾मुंबई इंडियन्स(Mumbai Indians) : रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह.
◾रॉयल चॅलेंजर्स बंगलोर(Royal challengers Bangalore) : विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल.
◾दिल्ली कॅपिटल्स(Delhi capitals) : पृथ्वी शॉ, रिषभ पंत, अक्षर पटेल, ॲनरिज नॉर्टजे.
◾सनरायझर्स हैदराबाद(Sunrisers Hyderabad) : केन विल्यमसन.
◾कोलकत्ता नाइट रायडर्स(Kolkata Knight riders) : सुनील नरीन, आंद्रे रसेल, वरुण चक्रवर्ती , व्यंकटेश अय्यर.
◾राजस्थान रॉयल्स(Rajasthan Royals) : संजू सॅमसन.
BCCI ने प्रत्येक टीम व्यवस्थापकांना ९० कोटींची पर्स दिली आहे. ज्याचा त्यांना त्यांच्या संघबांधणीसाठी उपयोग करायचा आहे. ४ खेळाडू रिटेन करण्यासाठी ४२ कोटींचा बजेट समोर ठेवण्यात आला आहे. ती रक्कम त्यांच्या सॅलरी पर्समधून वजा केली जाईल.


