माहितीप्रमाणे हे लोक हरियानातील पटणा मध्ये एका पोलीस अधिकारी गोपी सिंह यांच्या बहिणीच्या अंत्यविधीसाठी गेले होते. ओ.पी. सिंह हे सुशांत सिंह राजपूत चे मेहुणे आहेत.
हा अपघात कसा झाला हे अजून सांगता येत नाही कारण या घटनेत सुमो गाडीचा चालकही ठार झाला आहे. रिपोर्टनुसार पिपरा या गावामध्ये अपग्रेड मिडल स्कूल जवळ ट्रक आणि गाडीचे जोरात धडक झाली आणि अपघात घडला.
अपघातातील काही लोकांची प्रकृती खूपच गंभीर आहे. असे समजले आहे. अपघात झालेला भाग हा हलसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो. या घटनेचा तपास सुरू आहे.


