Amazon

Ads Area

header ads
header ads

Star Pravah आणि Zee Marathi वरील ह्या मालिका होणार बंद! हे आहे मुख्य कारण.

जीवन मराठी: आपल्या रोजच्या धावपळीच्या जीवनात थोडासा तरी दिलासा आराम हवाच असतो. मनोरंजन हा त्यासाठी उत्तम पर्याय ठरतो. प्रत्येकाचे मनोरंजन वेगवेगळ्या माध्यमातून केले जाते. सिनेमा नाटके मालिका हे सुद्धा मनोरंजनाचे मुख्य भाग आहेत.
आज आपण दोन वेगवेगळ्या चॅनल वरील दोन वेगवेगळे मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत त्यांच्याबद्दल जाणून घेऊया.


झी मराठी आणि स्टार प्रवाह या वाहिनींना प्रेक्षक अतोनात प्रेम देतात. पण या दोन वाहिनी मध्ये नेहमीच स्पर्धा असते. यावरच वाहिनीचा टीआरपी ठरत असतो.‌ म्हणूनच काही कारणांमुळे या दोन वाहिन्यांवरील दोन वेगवेगळ्या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत.

झी मराठीवरील 'ती परत आलीये' ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. मालिका बंद करण्याचे कारण वेगळे आहे. मुळातच या मालिकेचे ठरल्याप्रमाणे १०० एपिसोड चे चित्रीकरण पूर्ण झाले आहे त्यामुळे ही मालिका बंद करण्याचे निर्णय घेतले आहे. पुढील आठवड्यापासून कोणती नवीन मालिका येणार? की 'रात्रीस खेळ चाले ३' या मालिकेचे वेळ बदलणार हे अजून समजले नाही. नवीन मालिकेचा प्रोमो पुढील आठवड्यात रिलीज होण्याची शक्यता आहे.

स्टार प्रवाह वरील 'जय भवानी जय शिवाजी' या मालिकेने अवघ्या काही दिवसातच प्रेक्षकांचे मन जिंकले.पण सध्या या मालिकेला प्रेक्षकांकडून कमी प्रतिसाद मिळत आहे. त्याचप्रमाणे कमी टीआरपी मिळत असल्याने हा सुद्धा मालिका बंद करण्याचा मुख्य हेतू ठरला आहे. या मालिकेत   अभिनेता भूषण प्रधान शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसत आहेत.तर अभिनेते अजिंक्य देव शिवाजी महाराजांचे मावळे बाजीप्रभू देशपांडे यांची भूमिका बजावत आहेत. 

या मालिकेच्या जागी अभिनेता सचित पाटील याची मुख्य भूमिका असलेली 'अबोली' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २२ नोव्हेंबर रोजी 'जय शिवाजी जय भवानी' मालिकेचा शेवटचा भाग प्रेक्षकांना दाखवण्यात येईल.
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads