जीवन मराठी: Samsung Galaxy A13 5G Details :
Samsung पुन्हा एकदा त्यांचा नवीन स्मार्टफोन लवकरच लॉन्च करणार आहेत. नवीन फीचर्सने समृद्ध हा स्मार्टफोन बाकीच्या स्मार्टफोन कंपन्यांना मागे टाकून लवकरच एंट्री घेणार आहे. कारण सॅमसंग ने जाहीर केले आहे की या स्मार्टफोनमध्ये विशेष आणि नवीन फीचर्स देण्यात आले आहेत. चला तर मग पाहूया या स्मार्टफोन बद्दल अधिक माहिती..
Samsung एक नवीन स्मार्टफोन करण्याच्या तयारीत गुंतले आहेत जे 5G आवृत्तीवर काम करणार आहे तसेच ते ग्राहकांना पॉकेट फ्रेंडली ठरेल. हा Samsung A सिरीज मधला Galaxy A13 5G असणार आहे. माहितीप्रमाणे, नवीन वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच २०२२ मध्ये हा फोन लॉन्च होईल असा अंदाज आहे. सॅमसंग चा सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन ठरणार आहे.
Samsung Galaxy A13 5G specifications :
Samsung कंपनीने या नवीन स्मार्टफोन मध्ये ६.४८ -इंच FHD+ LCD वॉटरड्रॉप नॉचसह येईल असा अंदाज आहे. त्याचप्रमाणे हा स्मार्टफोन Mediatek Dimensity 700 chipset बेसड असू शकतो.
या डिवाइस मध्ये ४ GB/६ GB रॅम आणि ६४GB१२८GB इंटर्नल स्टोरेजसह दिला जाईल. फोटोग्राफीसाठी यात ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे ज्यामध्ये बॅक पॅनल वर ५० मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा, ५ मेगापिक्सेलचा अल्ट्रावाइड कॅमेरा आणि २ मेगापिक्सेल डेप्थ सेन्सर असू शकतो.
सॅमसंगच्या या स्मार्टफोनमध्ये २५ W जलद चार्जिंगसाठी ५००० mAh बॅटरी प्रोव्हाइड केली जाईल असा अंदाज आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार Samsung Galaxy A13 5G या स्मार्टफोन चे उत्पादन करण्यास सुरुवात झाली आहे. या नवीन येणाऱ्या स्मार्टफोनच्या खालील बाजूस ३.५ mm हेडफोन जॅक, तसेच USB-C पोर्ट आणि स्पीकर ग्रिल असू शकते. उजव्या काठावर पॉवर बटण आणि व्हॉल्यूम रॉकर कंपनी स्मार्टफोनला देईल.
हे पहा: 6 GB रॅम सह भन्नाट फीचर्स देणारे हे Smartphones तेही १०,००० पेक्षा कमी किंमतीत| Price and details
Samsung Galaxy A13 4G ची किंमत अजून काही लिक झाली नाही . परंतु काही अफवा नुसार सुमारे $२५० (सुमारे १८,७२० रुपये) असू शकते.


