Amazon

Ads Area

header ads
header ads

IPL 2022 : कोण असेल RCB चा नवीन captain ? त्यासाठी ह्या दोन खेळाडूंची नावे आली आहेत समोर.

जीवन मराठी: IPL 2022 सामन्यांसाठी सर्वचजण तयारीसाठी लागले आहेत. यावर्षी या हंगामा मध्ये १० संघांचा समावेश असल्याने सर्व खेळाडू मोठ्या विचारात पडले आहेत. विराट कोहली हा RCB चा कर्णधार होता परंतु या वर्षी त्याने RCB तर्फे खेळण्यासाठी साफ नकार दिला आहे.RCB आज पर्यंत आयपीएल मध्ये एकही ट्रॉफी जिंकले नाहीत. अशा परिस्थितीत नव्या कर्णधारपदाची जबाबदारी कोणाच्या खांद्यावर द्यायची हा सर्वात मोठा प्रश्न पडला आहे. कर्णधार पदासाठी दोन व्यक्ती पात्र ठरू शकतात. पण दोघांपैकी एकाला कर्णधार करण्यात येईल असा अंदाज आहे.


डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात आयपीएलचा मेगा लिलाव होणार आहे. ३० नोव्हेंबर पर्यंत सर्व संघांनी रिटन आणि रिलीज झालेल्या खेळाडूंची लिस्ट सबमिट करायची आहे.

डेव्हिड वॉर्नर हा सर्वात बेस्ट फलंदाज मानला गेला आहे. T-20 फॉर्मॅटमध्ये सर्वांनीच त्याच्या फलंदाजीचा जलवा पाहिला आहे. फलंदाजीमुळे त्याचे विशेष कौतुक केले जाते. कर्णधार पदासाठी RCB त्याला चान्स देऊ शकते. पण अहमदाबाद आणि लखनऊ या दोन टीम साठी सुद्धा त्याची आवश्यकता दर्शवण्यात आली आहे. T-20 सीरिजमध्ये वॉर्नर ने अतिशय जबरदस्त फलंदाजी  पार पाडली. हेच त्याच्यासाठी कर्णधार पदासाठी विशेष संधी ठरली आहे. संपूर्ण सामन्यात त्याने उत्तम कामगिरी पार पाडल्याने त्याला 'प्लेयर ऑफ द टूर्नामेंट' हा पुरस्कार मिळाला. 

कर्णधार पदासाठी दुसरे नाव म्हणजे शिखर धवन. दिल्ली संघ शिखर धवनला रिटेन करणार नाही अशी बातमी मिळाली होती म्हणून शिखर धवनला RCB चा कर्णधार होण्यास संधी  आरसीबी व्यवस्थापन देऊ शकते. ‌ शिखर धवन कडे अनेक विशेष कौशल्य आहेत. लांबचा पल्ला गाठणे हे त्याच्यासाठी खूप सोपे ठरले आहे. त्याने आयपीएलच्या १६ सामन्यात  ५८७ धावा काढल्या आहेत. सुरुवातीस त्याची कामगिरी चांगली होती पण शेवटी त्याचा फॉर्म  एवढा जबरदस्त राहिला नाही. परंतु शिखर धवन अनुभवी खेळाडू आहे त्याचप्रमाणे तो जबरदस्त फलंदाजी करू शकतो.  त्यामुळे याचा विचार करणे RCB ला भाग पाडले आहे.
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या