Xiaomi Redmi Note 11T 5G Details :
Xiaomi या कंपनीने आज पर्यंत अनेक स्मार्टफोन्स लॉन्च केले आहे. उत्तम फीचर्स आणि बजेट पाहता कंपनीकडून सर्वच सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात. आता या कंपनीचा नवीन स्मार्टफोन अवघ्या काही दिवसातच लॉन्च होणार आहे.
Xiaomi चा नवीन Redmi Note 11T हा 5G स्मार्टफोन 30 नोव्हेंबरच्या लॉन्चिंग नंतर हा ॲमेझॉन वरून ग्राहकांना विकत घेता येईल. हा स्मार्टफोन 5G जरी असला तरी कंपनीने याचे बजेट कमी ठेवले आहे. माहितीनुसार फोनची डिझाईन, फीचर्स, स्पेसिफिकेशन्स सुद्धा जबरदस्त आहेत.
अमेझॉनच्या लिस्टिंग माहितीप्रमाणे Redmi Note 11T हा फोन 5G सपोर्ट देईल. या स्मार्टफोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेट असलेला स्विफ्ट डिस्प्ले प्रोव्हाइड केला आहे.
Xiaomi Redmi Note 11T 5G specifications :
शाओमी च्या या स्मार्टफोनला MediaTek dimensity 8 10 प्रोसेसिंग पॉवर दिली आहे .जे 2.4 Ghz क्लॉक स्पीड सपोर्ट देते. याा फोनल 6.6 इंचाचा फुल एचडी + डिस्प्ले प्रोफाईट केला आहे. या फोनचा स्टोरेज पाहता तो 8GB RAM 128GB RAM पर्यंत असेल.
बजेट नुसार या स्मार्टफोन ला खूप चांगली बॅटरी प्रोव्हाइड करण्यात आली आहे. 5000mAh इतकी बॅटरी आणि 33 W चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. स्मार्टफोनमधील फोटोग्राफीसाठी 50 MP प्रायमरी रियल कॅमेरा सोबत 8 MP ultra wide sensor असलेला कॅमेरा सेटअप आहे. या फोनमध्ये फ्रंट कॅमेरा 16MP चा आहे.
या स्मार्टफोन मधील रॅम बुस्टर फीचर च्या मदतीने फोनच्या रॅम कमी झाल्यास इंटरनल मेमरी चा रॅम म्हणून वापर करता येऊ शकतो.


