Team India: यंदा दुबई येथे चालू असलेल्या टी20 विश्वकप-2021 भारत विरुद्ध पाकिस्तान(Ind vs pak) सामन्यात भारताचा जर्सी पाहायला मिळाला मात्र या जर्सीवर केवळ एक स्टार BCCI च्या लोगो वर दिसत आहे. या अगोदर झालेल्या सामन्यांमध्ये भारतीय टीमच्या जर्सीवर 3 स्टार असायचे. पण असे का? असा प्रश्न आपल्याला देखील पडला असेल! चला तर जाणून घेऊ.
भारतीय जर्सी वर असणारे हे तीन स्टार्स आपल्या भारताच्या विश्वकप स्पर्धेत जिंकलेले कप दाखवतात. म्हणजे भारताने या अगोदर 3 विश्वचषक जिंकले आहेत. त्यामुळे भारताच्या जर्सी वर 3 स्टार्स असतात.
हे तीन स्टार्स 1983 साली जिंकलेला वर्ल्ड कप, 2007 साली जिंकलेला टी20 वर्ल्डकप आणि 2011 साली जिंकलेला एकदिवसीय विश्वचषक दर्शवतात.
मात्र यावर्षी जर्सीवर एकच स्टार का?
याच मुख्य कारण म्हणजे सध्या T20 वर्ल्डकप चालू आहे. आणि या अगोदर भारताने T20 विश्वचषकात केवळ 2007 साली जिंकलेला एकमेव वर्ल्डकप आहे. म्हणून भारतीय जर्सीवर यावर्षी केवळ एकच स्टार दर्शविण्यात आला आहे.
कशी वाटली ही माहिती? नक्की कमेंट द्वारे कळवा.
आणि 'जीवन मराठी' फॉलो करायला विसरू नका.


