भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना काही तासातच सुरू होणार आहे. एम एस धोनी हे टीम इंडियाचे मेंटर आहेत. तरीसुद्धा या मॅच आधी असे काहीतरी घडले जे कॅमेऱ्यात कैद झाल्याने प्रेक्षकांमध्ये अफलातून चर्चा सुरू झाली आहे. २३ ऑक्टोंबर चा हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
नक्की घडले काय ?
धोनी आणि के एल राहुल हे सराव केल्यानंतर दोघेही मैदानावरून हॉटेलकडे जात असताना हा प्रकार घडला. धोनीनेही त्याच्यासमोर आलेल्या या प्रस्तावाला चोख प्रत्युत्तर दिले आहे. हे प्रकरण खूप गंभीर असं काही नाहीये.
टीम इंडिया आपला सराव संपवून परतत असताना पाकिस्तानची अँकर सवेरा पाशाने हे क्षण आपल्या कॅमेऱ्यात कैद केले. तिची नजर पहिल्यांदा के.एल. राहुलवर पडली. राहुलला पाहताच अँकरने त्याला 'पाकिस्तानविरुद्ध चांगली फलंदाजी करू नको,' अशी विनंती केली. सवेरा राहुलला म्हणाली की, कृपया, उद्या चांगला खेळू नकोस.' पाक अँकरने २-३ वेळा विनंती केल्यानंतर राहुलने तिच्याकडे पाहिलं आणि हसत पुढे निघून गेला.
त्यानंतर सवेराने धोनीकडे वळली , पण धोनी मास्टर माईंड आहे तो गप्प बसला नाही. त्याने सवेरा पाशाला चोख प्रत्युत्तर दिले. धोनी म्हणाला की, 'आमचं कामच असं आहे.' धोनीने कुणाचं नाव घेतलं नाही, पण त्याचा इशारा पाकिस्तानकडे होता. पाकिस्तानला पराभूत करण्याचं काम आहे, असं त्याला म्हणायचे होते.
पण हा सर्व विनोदी प्रकार असल्याने काहीच गंभीर नाही.


