जागतिक कमोडिटी बाजारात कच्च्या तेलाचा भाव आज $80 इतका झाला आहे. म्हणूनच सर्व पेट्रोलियम कंपन्यांनी दरवाढीचा निर्णय घेऊन ग्राहकांना कोड्यात टाकले आहे.
डिझेल १.५५ रुपयांनी तर पेट्रोल ७० पैशांनी महागले आहे..
आज शुक्रवार दिनांक 1 ऑक्टोंबर पेट्रोल दरात 25 पैसे आणि डिझेल मध्ये 30 पैसे वाढ करण्यात आली.
कच्चा तेलाच्या महागाईने देशात इंधनाची मोठी उनिव भासत आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी दरवाढीचा निर्णय घेऊन शुक्रवारी म्हणजे आज पेट्रोल दरात 25 पैसे आणि डिझेल दरात ३० पैसे
वाढ केली आहे. मागील आठ दिवसात पेट्रोल 70 पैशांनी वर गेले तर डिझेल १.५५ रुपयांनी महागले आहे.
काय आहे मुंबईतला वाढलेला दर...
आजच्या दरवाढीनंतर मुंबईत एक लिटर पेट्रोलचा भाव १०७.९५ रुपये इतका आहे. तर डिझेल ९७.८४ रुपये असा आहे.
दिल्लीतला दरवाढीनंतरचा दर...
आज दिल्लीत पेट्रोल १०१.९५ रुपये झाला आहे. आणि डिझेल ९०.१७ रुपये इतका आहे.
चेन्नईत पेट्रोलचा भाव ९९.५८ रुपये असा असून डिझेल ९४.७४ रुपये असा आहे. त्याचप्रमाणे कोलकत्ता आज एक लिटर पेट्रोल १०२.४७ रुपये असा आहे तर डिझेल ९३.२७ रुपये इतका आहे.
युरोपात तेलाची मागणी वाढली असून पुरवठा मर्यादित असल्याने नजीकच्या काळात तेलाचा भाव आणखी वाढण्याची शक्यता दर्शवली गेली आहे.



