नवीन आलेल्या सर्व मालिकांना प्रेक्षकांचं उत्तम प्रेम आणि उदंड प्रतिसाद मिळत आलं.
त्यातील एक लोकप्रिय झालेली आणि प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारी मालिका म्हणजे मन उडू उडू झालं. ऋता दुर्गुळे आणि अजिंक्य राऊत हे दोघं या मालिकेद्वारे प्रेक्षकांच्या मनावर प्रचंड ताबा मिळवला आहे.
इंद्रा आणि दिपू यांच्या आगळ्यावेगळ्या जोडीवर प्रेक्षकांनी मन भरून प्रेम करत आहे.
पण सध्या मालिकेत दाखवल्या जाणाऱ्या काही पटणार्या घटना प्रेक्षकांना नाराज करत असल्याचे दिसून येत आहे.
प्रेक्षकांनी मालिकेवर चांगलाच संताप व्यक्त केला असून न पटणाऱ्या दाखवण्यात आलेल्या घटनांवर प्रेक्षक त्यांचे मत व्यक्त केले आहेत.
दिपू आणि इंद्राची जोडी ही भारी असली तरी सोशल मीडियावर या मालिकेबद्दल अनेक निगेटिव चर्चा होत आहेत.
नक्की काय झाले....
मालिकेत दिपू चे वडील शिक्षक आहे असे दाखवण्यात आलं असतानाही ते लेकीच्या लग्नासाठी हुंडा देतात .असं दाखवले आहे तर मुलाकडची मंडळी वाटेल त्या मागण्या मागून देशपांड्यांना फसवत आहे. त्यावर वाटेल तसं बोलून अपमान करतात आणि दिपू चे वडील ते निमूटपणे ऐकून घेतात.
शलाका च्या लग्नासाठी सर्व मागण्या पूर्ण करताना होणारी धावपळ हे खूप त्यांच्यासाठी त्रासदायक असतानाही शांतपणे मागण्या पूर्ण करण्यास होकार दिला जातो.
ह्या घडामोडी रसिकांचा संताप ठरला आहे. सोशल मीडियावर अनेक व्हिडिओद्वारे चाहते त्यांचा राग व्यक्त करताना दिसत आहेत.
'मुलींच्या बापाची लाचारी दाखवणे बंद करा', 'मूर्खपणाचा कळस 'अशा अनेक प्रतिक्रिया सध्या प्रेक्षकांकडून सादर केल्या जात आहेत.




