#INDvsPAK: भारताला सहाव्यांदा पाकिस्तानला हरवण्याची संधी:
भारत आणि पाकिस्तान म्हणजे सख्खे शेजारी पक्के वैरी.
आतापर्यंत भारत आणि पाकिस्तान एकमेकांसमोर पाच वेळा आले आहेत आणि यामध्ये पाकिस्तान भारताकडून चारीमुंड्या चित झाला आहे आज ट्वेंटी-ट्वेंटी वर्ल्डकप मध्ये पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान एकमेकांसमोर आले आहेत म्हणजेच पाकिस्तानला हरवण्यासाठी भारताला हा सहावा मोका मिळालेला आहे त्याला तर आता पाहू यात या अगोदरचे पाच मॅच कसे झाले आहेत.
● पाकिस्तानला भारताने केलं 'बॉल आऊट'
पहिल्या T20 Worldcup मध्ये भारत आणि पाकिस्तान दर्बन येथील मैदानात पहिल्यावेळी आमने-सामने आले होते. मुख्य म्हणजे हा सामना टाय झाला. हा सामना टाय झाल्यामुळे सुपरओव्हर हा नियम अस्तित्वात नसल्यामुळे या सामन्याचा निकाल बॉल आऊट म्हणून घेण्यात आला. बॉल आऊट म्हणजे काय? तर सहा चेंडू मध्ये जास्तीत जास्त स्टंप आऊट करणारी टीम विजयी मानली जाते आणि यामध्ये भारताने जास्त विकेट घेऊन पाकिस्तानला हरवलं आणि या पहिल्या मॅच मध्ये विजय मिळवला.
● पाच धावानी भारत पहिला T20 वर्ल्डकप जिंकला
भारत आणि पाकिस्तान 2007 च्या अंतिम सामन्यांमध्ये आमने-सामने आले होते. यामध्ये रोहित शर्मा 36 धावा (नॉट आउट) आणि गौतम गंभीरच्या 75 धावा या दोघांच्या फलंदाजीच्या जोरावर भारताने ही मॅच आपल्या खिशात घातली होती. ह्या मॅचमध्ये भारताच्या 5 बाद 157 धावा झाल्या होत्या.(india pakistan war at ground) भारताने दिलेले आव्हान पाकिस्तान योग्यरीतीने पाठलाग करत होता मात्र शेवटी 6 धावा 4 चेंडूत हव्या होत्या त्यावेळी मिसबह उल हक ने आत्मघातकी फटका मारून श्रीशांतकडे झेल देत बाद झाला आणि या वेळी भारताने हा सामना 5 धावांनी जिंकला होता आणि या सामन्यामुळे भारत हा पहिल्या टी-20 वर्ल्ड कपचा विजेता झाला होता.
● 2012च्या सुपर 8 फेरी मध्ये भारताने आठ विकेटने विजय मिळवला.
श्रीलंका येथे झालेल्या 2012च्या विश्वचषकामध्ये(icc t20 world up) भारत-पाकिस्तान पुन्हा एकदा आमने-सामने आले होते. यावेळी सुपर 8 फेरीचा सामना रंगला होता. हा सामना अत्यंत एकतर्फी झालेला होता. तर सामन्यामध्ये भारताने पाकिस्तानवर 8 विकेट्सने विजय मिळवलेला होता. या सामन्यात लक्ष्मीपती बालाजी ने तीन विकेट घेतले होते तर पाकिस्तानला 128 धावांवर थोपवण्यात यश मिळवलं होतं. तर या सामन्यात विराट कोहली ने 78 (नॉट आउट) धावा केल्या होत्या आणि हे आव्हान केवळ दोन विकेटच्या मोबदल्यात पूर्ण करत या सामन्यात पाकिस्तानवर भारताने विजय मिळवलेला होता.
●2014 च्या साखळी फेरी मध्ये भारताने सात विकेट्सने विजय मिळवला
भारत-पाकिस्तान(India Pakistan Match) 2014 मध्ये झालेल्या बांगलादेशातील वर्ल्डकपमध्ये आमने-सामने आलेल्या सामन्यामध्ये भारताने पाकिस्तानला 7 विकेट्सने हरवलं आणि मागील सामन्याप्रमाणे आपला दबदबा कायम ठेवला. ढाका येथील मैदानावर झालेल्या मॅचमध्ये पाकिस्तानने 7 बाद 130 धावांचा आव्हान भारताला दिलं तर भारताने हा सामना 9 चेंडू शिल्लक ठेवत आरामात जिंकला होता.
● 2016 च्या सुपर टेन फेरीमध्ये भारताने 6 विकेटने विजय मिळवला
भारतातील कोलकाता येथे झालेल्या ईडन गार्डन मैदानावर भारत-पाकिस्तान पुन्हा एकदा आमनेसामने आले होते आणि या सामन्यातसुद्धा भारताने पाकिस्तानला हरवलं होतं तर हा सामना पावसामुळे केवळ 18 षटकांचा खेळविण्यात आला होता. यामध्ये पाकिस्तान 118 धाव करत भारताला आव्हान दिलं तर या वाहनाचा पाठलाग भारतानं करत असताना या मॅच भारताची अवस्था 3 बाद 23 अशी झाली मात्र विराट कोहलीने 37 चेंडूंमध्ये नाबाद 55 धावा केल्या आणि हा सामना भारताने जिंकला.
2021 Men's T20 World Cup
तर आज पुन्हा एकदा India vs Pakistan आमने-सामने येणार असून हा सामना दुबई इंटरनॅशनल स्टेडियम वर सायंकाळी साडेसात वाजल्यापासून चालू होणार आहे. या सामन्याचे थेट प्रक्षेपण डिस्ने हॉटस्टार आणि स्टार स्पोर्ट्स, डीडी स्पोर्ट्स वर दाखवण्यात येणार आहे.
● Virat Kohli Vs Babar Asan
आतापर्यंत झालेल्या टी-20 सामन्यांमध्ये कप्तान ची कामगिरी पाहिली तर विराट कोहलीने 45 मॅच मध्ये 27 विजय मिळवले आहेत. तर 14 पराभव झाले आहेत तर दोन टाय आणि दोन अनिर्णयीत झाले आहेत.
बाबर आजम या पाकिस्तानचा कर्णधाराविषयी बोलायचं तर त्याने आत्तापर्यंत 28 सामने खेळले असून त्यापैकी पंधरा सामने विजय झाला आहे. तर 8 पराभव आणि टाय शून्य अनिर्णीत 5 झाले आहेत. या दोघांची टक्केवारी पाहिली असता विराट कोहलीची 65.11 होते तर बाबरची 65.21 होते.
अशाच India vs Pakistan News, India- Pakistan Updates महत्वाच्या अपडेटसाठी 'जीवन मराठी' ला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
हा लेख नक्की आपल्या सोशल मीडियावर शेअर करा


