भारतात अनेक प्रकारचे सण-उत्सव साजरे केले जातात. विविध प्रकारचे लोक एकत्र येऊन ,आपापसातील मतभेद- द्वेष विसरून सर्वांनी मिळून सणाचा आनंद घ्यावा हा सण- उत्सव साजरे करण्याचा मूळ उद्देश आहे.
दसरा ,दीपावली ,गणेशोत्सव यासारखे सण आपल्या भारतात मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात.
मराठी वर्षभरात येणाऱ्या सण उत्सवांचा राजा म्हणजेच दीपावली हा खूप महत्वाचा सण मानला जातो.
दिवाळीचा पहिला दिवस म्हणून वसुबारस चा मान असतो. या दिवशी गाय आणि तिचे वासरू यांची मनोभावे पूजा केली जाते. भारत हा कृषिप्रधान देश आहे .येथे पशुंचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. भारतीय संस्कृतीत गाईला मातेचा दर्जा देण्यात आला आहे. ती नेहमीच आपल्यांना मदत करत असते. त्यामुळे कृतज्ञतेच्या भावातून आपण वसुबारस(VasuBaras 2021) या दिवशी गाय आणि तिच्या वासरू चे पूजा करतो.
अश्विन वद्य द्वादशी वसुबारस या सणाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात.
असा साजरा करा यंदाच्या दिवाळीचा पहिला दिवस
सर्व सणांच्या राजा म्हणून मानल्या गेलेल्या दीपावली हा सण सर्वांना आनंद देणारा आहे. रांगोळी ,दिवे, पणती ,नवनवीन कपडे, साहित्य, फराळाचे पदार्थ या सर्वांची तयारी करून आपण दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दीपावली साजरी करणार आहोत. गोवत्स द्वादशी हा दिवाळीचा पहिला दिवस म्हणून आपण गाईची पूजा करतो पण वस्तुतः तो सण वेगळा आहे. देशातील बहुतांश ठिकाणी वसुबारस पासून दिवाळीला सुरुवात होते असे मानतात.
Vasubaras Kadhi Ahe?
दीपावली 2021 मध्ये वसुबारस हा १ नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात येणार आहे. समुद्रमंथनातून पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या. त्यातूनच नंदा नावाच्या धेनूला उद्देशून हा सण साजरा करण्याचा वैशिष्ट्य आहे. वसुबारस या शब्दातील वसू म्हणजे धन त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी असा अर्थ होतो.
कशी कराल वसुबारस पूजा ? (Vasubaras in marathi)
अश्विन कृष्ण द्वादशी या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया एक भुक्त राहून सकाळी किंवा सायंकाळी सवत्स गायीची पूजा करतात.
तत: सर्वमये देवी सर्वदेवैरलङ्कृते |
मातर्ममाभिलषितं सफलं कुरू नन्दिनि ||
हे सर्व देवांनी अलंकृत अशा नंदिनी माते तू माझे मनोरथ सफल कर असा या काव्याचा अर्थ आहे. वसुबारस च्या दिवसापासून अंगणात रांगोळी, दिवे, पणत्या लावण्यास सुरुवात करावी. या दिवशी तेला तुपात तळलेले पदार्थ आणि गाईचे दूध, तूप ,ताक खायचे नसते. उडदाचे वडे, भात व गोड पदार्थांचे जेवण गाईला खाऊ घालतात. घरात लक्ष्मी देवीचे आगमन व्हावे या हेतूने गाईची पूजा करावी. घरातील सौभाग्यवती बायका गाईच्या पायावर पाणी घालून त्यास हळद-कुंकू अक्षता व्हावे. पुरणाचा नैवेद्य करून त्यास खाऊ घालावे. गाईला मनोभावे निरांजनाने ओवाळून त्यास नैवेद्य द्यावा.
वसुबारस चे महत्व :
भारतीय संस्कृतीत गाईला मातेचा दर्जा दिला आहे. ती सात्विक, पवित्र असल्याने पुजना द्वारे तिच्या सात्विक गुणांचा स्वीकार करावा असे म्हटले जाते. आपल्यात दुधाने समाजाला बलिष्ठ करणाऱ्या आपले अंग प्रत्येक मग अर्पण करून समाजाला उपयोगी पडणाऱ्या , शेतीला उपयुक्त अशा बैलांना जन्म देणाऱ्या गाईचे या दिवशी पूजन करतात. मुख प्राण्यांचे संरक्षण करावे ,त्यांची जपणूक करावी अशी आपली भारतीय संस्कृती सांगते. अशाप्रकारे व गाईमातेचे पूजन करून दीपावली सणाला सुरुवात केली जाते.
तुम्हाला वसुबारस शुभेच्छा
अश्याच vasu baras images, वसुबारस शुभेच्छा फोटो, वसुबारस रांगोळी, Vasu baras photos, Vasubaras Greeting, Vasubars Status Marathi मध्ये मिळवण्यासाठी 'जीवन मराठी' ला फॉलो करा.


