Amazon

Ads Area

header ads
header ads

'सुख म्हणजे नक्की काय असतं' निर्माते महेश कोठारे यांना "ह्या " चुकीमुळे मागावी लागली माफी....

 स्टार प्रवाह वरील मालिका 'सुख म्हणजे नक्की काय असतं ' प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवून खूपच लोकप्रिय ठरत आहे.

परंतु मालिकेमधील झालेल्या एका नकळत चुकीमुळे मालकीच्या निर्मात्यांना प्रेक्षकांची माफी मागावी लागली आहे.



काय झाली नेमकी चूक ?


सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या सिन मध्ये एका दृश्यात चूक झाली आहे. त्या दृश्यामुळे समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असल्यामुळे मालिकेच्या निर्मात्यांनी म्हणजेच प्रसिद्ध अभिनेता महेश कोठारे यांनी प्रेक्षकांची माफी मागितली.

सोशल मीडियावर या मालिकेबद्दल अनेक विषय चर्चेत असतात.

ही मालिका प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरली आहे. मालिकेने अनेकदा टीआरपी यादीत प्रथम क्रमांक मिळवला आहे.

पण सध्या मालिका एका वेगळ्याच वळणावर येऊन थांबली आहे. ते म्हणजे एका दृश्यात झालेल्या चुकीमुळे मालिकेचे निर्माते महेश कोठारे यांना माफी मागावी लागली.


१४ सप्टेंबर रोजी दाखवण्यात आलेल्या एका सिन मुळे हा वाद निर्माण झाला असून हा वाद चर्चेचा ठरला आहे.

मालिकेत दाखवण्यात आलेल्या  सँडी या व्यक्तिरेखेच्या ब्लाऊज वर तथागत गौतम बुद्धांचे चित्र छापण्यात आलं होतं. त्यामुळे विशिष्ट समाजाच्या भावना दुखावल्या असून निर्मात्यांवर ठाणे पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनेक सोशल मीडिया त्याचप्रमाणे ट्विटर वर पोस्ट करत त्यांनी आपली बाजू मांडून सगळ्यांची माफी मागितली आहे.

या व्हिडिओमध्ये महेश जी म्हणाली की," ही चूक जाणीवपूर्वक केली गेली नाही याची मी खात्री देतो. मालिकेतील कलाकार आणि वेशभूषा करणारे सगळ्यांना गौतम बुद्ध बद्दल नेहमीच आदर आहे. तुम्ही मोठ्या मनाने आम्हाला माफ कराल अशी इच्छा आहे. अशी चूक पुन्हा कधीही घडणार नाही याची खात्री देतो."


हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या