आजची एक न्यूज तुमची गुड न्यूज ठरू शकते. जर तुम्ही Airtel यूजर असाल तर या कंपनीने एक नुकतीच नवीन घोषणा जाहीर केली आहे. ही घोषणा फायद्याची ठरू शकते.
चला तर पाहूया याबद्दल सविस्तर माहिती.
🎗️वैशिष्ट्ये :
💫Airtel कंपनीने जाहीर केली मोठी घोषणा.
💫आता रिवॉर्ड १२३ प्लस डिजिटल बचत खाते खुले करणार.
💫युजर्सना १ वर्षासाठी Disney+ Hotstar मोबाईल सदस्यता.
एअरटेल कंपनीने शुक्रवारी एअरटेल पेमेंट बँक रिवॉर्ड १२३ प्लस डिजिटल बचत खाते सुरू करण्याची घोषणा केली.
हे डिजिटल बचत खाते युजर्सना ४९९ रुपयांच्या वार्षिक शुल्कावर उपलब्ध असेल ज्यामध्ये ग्राहकांना cashback सह अनेक विविध प्रकारचे फायदे मिळतील.
Airtel पेमेंट्स बँकेच्या रिवॉर्ड १२३ प्लस डिजिटल बचत खात्यात युजर्सना एक वर्षासाठी डिज्नी प्लस मोबाईल सदस्यता देखील फ्री मिळेल.
पहा काय आहेत फायदे :
Airtel च्या या नवीन प्लॅन मुळे ग्राहकांना अनेक फायदे मिळतील त्यातील पहिला म्हणजे डिजिटल बचत खात्यात ग्राहकांना एक वर्षासाठी डिज्नी प्लस हॉटस्टार चे मोबाईलची मोफत सदस्यता मिळवता येईल त्याचप्रमाणे सबस्क्रीप्शन ची किंमत ही खूप कमी आहे. या सबस्क्रीप्शन साठी ४९९ रुपयांचा प्लान आहे.
युजर्स जेव्हां त्यांच्या वॉलेट मध्ये पैसे जोडतील तेव्हा त्यांना दरमहा दहा रुपयांचा कॅशबॅक मिळेल म्हणजे किमान व्यवहाराची रक्कम 1000 रुपये असावी.
याशिवाय ग्राहकांना 30 रुपयांचा फ्लॅट पेमेंटचा लाभही घेता येईल.
मोबाइल प्रीपेड रिचार्ज, पोस्टपेड, ब्रोड बँड, लँडलाईन आणि डीटीएच बिल पेमेंट वर महिन्यातून एकदा युजर्सच्या खात्यात जमा होईल यासाठी किमान देय रक्कम 225 रुपये असावी.
एअरटेल च्या या बचत खात्यात ग्राहकांना एक लाख ते दोन लाख रुपयांच्या शिल्लक 6 टक्के व्याज शुन्य किमान शिल्लक आणि ऑटो सुविधेसह मर्यादित मिळतील.
एकदा जर ग्राहकांनी या बचत खात्यामध्ये आपले खाते उघडले किंवा ग्रेड केले की ते त्यांच्या नोंदणीकृत क्रमांकाचा वापर करुन Disney+Hotstar वेबसाईट किंवा ॲप द्वारे सदस्य त्यादेखील सक्रीय करू शकतात.



