Amazon

Ads Area

header ads
header ads

भारतीय लष्करात मिळणार अभियंतानाही संधी...... लवकरच TGC vecancy साठी अर्ज होणार सुरू .

आता भारतीय लष्करात मिळणार अभियंतानाही संधी. अभियंत्यांसाठी काही रिक्त जागा भारतीय सैन्यदलात निर्माण केले जात आहे . TGCकोर्स वेकन्सी 2021 साठी अर्ज मागवण्यात आले आहे. जानेवारी 2021मध्ये प्रशिक्षण सुरू होईल अशी बातमी दिली गेली आहे.


🎗️काय आहेत मुख्य बातम्या:

▪️टीजीटी प्रवेश साठी भारतीय सैन्यात रिक्त जागा.

▪️अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी सरकारी नोकरीची संधी.

▪️अर्ज प्रक्रिया सुरू झाल्याची बातमी.

अनेक  तरुण भारतीयांचे स्वप्न आहे की भारतीय सैन्य दलात प्रवेश घेण्याची, पण अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचे काय?
आता काळजी करणे असेल काहीच कारण नाही आणि आपल्या स्वप्नांसाठी हे सुवर्णसंधी आहे.
जर तुम्ही अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले असेल तरीसुद्धा तुम्हाला भारतीय लष्करात नोकरी मिळण्याची उत्तम संधी हे भारत सरकार तसेच इंडियन आर्मी यांनी दिले आहेत.
भारतीय लष्कराने तांत्रिक पदवी अभ्यासक्रमासाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे .(Technical Graduate Course)
 जे उमेदवार किंवा अभियांत्रिकी विद्यार्थी अभियांत्रिकीच्या कोणत्याही शाखेतून तसेच B.Tech,BE करत आहेत ते यासाठी अर्ज करू शकतात. ७ द्या व्या वेतन श्रेनी नुसार केंद्र सरकार कडून उत्तम वेतनाचा  लाभ मिळेल.



भारतीय सैन्याची ही १३४ वी TGC एन्ट्री आहे या इंट्री नुसार जे उमेदवारांची  निवड होईल त्यांची ट्रेनिंग प्रशिक्षण जानेवारी २०२२  मध्ये सुरू  होईल. भारतीय सैन्यात या प्रवेशासाठी रिक्त पदांची संख्या 40 असे आहे. यामध्ये निवडल्या गेलेल्या तरुणांना पूर्ण वेतन त्याचप्रमाणे अनेक भत्यांसह सुरुवातीचे वेतन श्रेणी दरमहा ५६,१०० रुपये म्हणजेच बेसिक वेतन म्हणून मिळेल. पुढे हे वेतन दर महा १.७७ लाख रुपयांपर्यंत जाईल.

काय असेल पात्रता Indian Army TGC eligibility ?

इंजिनिअरिंगच्या कोणत्याही शाखेतून किंवा विषयातून B.Tech किंवा BE म्हणजेच ग्रज्युएशन अभ्यासक्रम पूर्ण करणारे सर्व विद्यार्थी या रक्त पदासाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. इंजिनिअरिंगच्या अंतिम वर्षात देखील हे अर्ज करू शकता येते. उमेदवाराचे वय २० ते २७ वर्षांच्या दरम्यान असावे अशी अट आहे. आरक्षित वर्गांना वयोमर्यादा वाढवून दिली जाईल.

Indian army TGC application form: अर्ज कसे करावे?

भारतीय सैन्यात जाण्याचे अनेकांचे स्वप्न आहे ते स्वप्न आता पूर्ण करता येईल. टीजीसी या रिक्त प्रवेशामुळे अनेकांना संधीही मिळेल.
अर्ज करण्यासाठी joinindianarmy.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपण आपली नोंदणी करू शकतो.
१७ ऑगस्ट २०२१ पासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख १५  सप्टेंबर २०२१ असे आहे.
कोणतेही शुल्क किंवा फीज आकारले जाणार नाही.


ऑनलाइन अर्जाची लिंक खाली दिलेले आहे.






🎗️अधिक माहितीसाठी जीवन मराठीच्या पेजला  फोलो करा.


हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या