महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TET आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्याकडून घेण्यात येत असलेली राज्य पात्रता परिक्षा म्हणजेच SET या दोन्ही परिक्षांच्या तारखा समोर आल्या आहेत.
लॉकडाऊनमुळे सर्वच वेळापत्रक बिघडले आहे. त्यामुळे या परिक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून अंतिम वेळापत्रक जाहीर झाले आहे.
Teacher's Eligibility Test ची नोंदणी प्रक्रिया सध्या चालू असून या परिक्षेची उमेदवारांना नोंदणी करण्याची अंतिम मुदत 25 ऑगस्ट म्हणजेच उद्यापर्यंत आहे. ही परीक्षा देण्यासाठी इच्छुक असलेले उमेदवार mahatet.in/ या वेबसाईटवर आपली नोंदणी करु शकतात. तर ही परिक्षा 10 ऑक्टोबर रोजी होणार आहे. पण लॉकडाऊनमध्ये या तारखेत बदल होण्याची शक्यता ही परीक्षा आयोजित केलेल्या परिक्षा परिषदेने वर्तवली आहे.
👉प्रवेशपत्र मिळण्याची तारीख- 25 सप्टेंबर 2021
👉परिक्षा पेपर 1-10 ऑक्टोबर 2021 (सकाळी 10:30 ते दुपारी 1)
👉परिक्षा पेपर 2-10 ऑक्टोबर 2021 (दुपारी 2 ते संध्याकाळी 4:30)
राज्य पात्रता परिक्षा(SET)
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून घेण्यात येणाऱ्या राज्य पात्रता परिक्षा 26 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे.
या परिक्षेसाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांची अंतिम यादीही विद्यापीठाने setexam.unipune.ac.in/Home.aspx या वेबसाईटवर उपलब्ध करुन दिली आहे.
या परिक्षेच्या अगोदर 10 दिवस आधी विद्यार्थी आपले ऍडमिट कार्ड वेबसाईटवरून डाउनलोड करु शकतात.


