वातावरण बदलाचा सर्वात धोका किनारपट्टीवरील शहरांना आहे. यात सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या मुंबई शहराला विशेषतः जास्त धोका आहे.
सागरी पातळीतील बदल, अतिपर्जन्यवृष्टी यामुळे वातावरण बदलाच्या दुष्परिणाम यांचे हॉटस्पॉट किनारपट्टीवरील शहर असलेले मुंबई ठरत आहे.
इंटरगव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज म्हणजेच आयपीसीसीने याचा एक अहवाल तयार केला आहे. ज्यात IIT मुंबईचे सुबिमल घोष यांचा देखील समावेश आहे. त्यांनी म्हटले आहे कि, जागतिक आणि स्थानिक वातावरणामधील बदलांचा मुंबई सारख्या मोठ्या प्रमाणात लोकसंख्या असलेल्या शहराला जास्त धोका आहे.
त्यामुळे या शतकाच्या अखेरपर्यंत देशाच्या किनारपट्टीवरील मुंबईसह १२ शहरं पाण्याखाली जाण्याचा धोका आहे. या शहरांमध्ये मुंबई, चेन्नई, कोची आणि विशाखापट्टणमचा समावेश असून ही शहरं ३ फूट पाण्यात असतील असं सांगण्यात आलं आहे.
अंतराळ संशोधन संस्था नासानं IPCCच्या अहवालाचं मूल्यांकन केलं आहे. त्यानंतर भारतामधल्या बारा शहरामध्ये शतकाच्या शेवटी पाण्याची पातळी वाढलेली जाणवण्याची शक्यता आहे. यापूर्वी १०० वर्षात असे बदल होत होते. मात्र २०५० नंतर दर 6 ते 9 वर्षांत असे बदल दिसतील असंही या अहवालामध्ये नमूद करण्यात आलं आहे.


