Amazon

Ads Area

header ads
header ads

का साजरी केली जाते नागपंचमी? Nagpanchmi 2021

श्रावण महिन्यातील नागपंचमी हा सण नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न करण्याची पद्धत आहे. भगवान श्रीकृष्ण यांनी कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीतून बाहेर आले तो दिवस होता श्रावण महिन्यातील शुद्ध पंचमीचा. म्हणूनच त्या दिवसापासून नागपूजा करण्यात येते असे मानले जाते. नागपंचमीच्या दिवशी दर बारा वर्षांनी देशभर मधील नाथ संप्रदाय लोक गंगा गौतमी संगमावर स्नान करतात.
आख्यायिका नेमकी काय?

एका शेतकऱ्याच्या नांगरामुळे नागिनीचे तीन पिल्ले मृत्युमुखी पडली होती त्यामुळे नागीण चिढते आणि शेतकऱ्याच्या मागे लागते. त्यावेळी शेतकऱ्याची बायको त्या नागिनींची माफी मागून तिची पूजा करते. त्यावेळी नागीण त्या शेतकऱ्याला माफ करते. तसेच हा प्रकार पुढे घडू नये म्हणून या दिवशी सर्व शेतकरी आपल्या शेतात नांगरत नाहीत कोणीही खणत सुद्धा नाहीत तसेच घरामध्ये कोणत्याही भाज्या चिरायच्या नाहीत सोबतच तवा वापरायचे नाही किंवा कुटायचे नाही अशी प्रथा आहे नागदेवतेची पूजा करून तिला दूध आणि लाह्या तसेच गव्हाची खीर नैवेद्य म्हणून श्रद्धाळू लोक दाखवतात आणि आमचे संरक्षण कर अशी प्रार्थना यावेळी करतात.

तर या दिवशी आठ नागांची पूजा केली जाते यामध्येअनंत (म्हणजेच शेष), वासुकी, पद्मनाभ, कम्बल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक आणि कालिया यांची पूजा केली जाते.
तर भविष्यात तर पुराणांमध्ये वेगळ्या आठ नागांची नावे सांगितले आहेत.

वासुकिः तक्षकश्चैव कालियो मणिभद्रकः।
ऐरावतो धृतराष्ट्रः कार्कोटकधनञ्जयौ ॥
-- (भविष्योत्तरपुराण – ३२-२-७)

पण वरील श्लोकामध्ये वासुकी, तक्षक, कालिय, मणिभद्रक, ऐरावत, धृतराष्ट्र, कार्कोटक आणि धनंजय, असे त्यांची नावे आहेत.

भारतीय संस्कृतीत का आहे नागपंचमीला महत्व.

भारतीय संस्कृतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारे नागांची पूजा केली जाते नाग म्हणजे मन आजारी सर्प तर नागाच्या फण्यावर पुढच्या बाजूने दहा या अंकाचा सारखेच चिन्ह असते नागाचा रंग हा हिरवा आणि पिवळा असतो तर त्याच्या तोंडात विषय असलेले दात असतात नागाची जीभ ही दोन भागात दुभंगलेली असते कृषी संस्कृतीमध्ये नागाच्या पूजनाचे महत्त्व आहे कारण नाग आणि साप हे शेताचे रक्षण करते मानले जातात आणि म्हणूनच शेतकऱ्यांचा मित्र म्हणून ही संबोधले जाते.

स्त्रियाच्या आयुष्यात नागपंचमी सणाचे महत्व

नागपंचमी या सणा दिवशी विवाहित बहिणीला तिचा भाऊ माहेरी घेऊन येतो, अशी भारतात पद्धत आहे तर काही ठिकाणी स्त्रिया आणि मुली झाडाला झोके बांधून गाणे म्हणत झोके घेतात. तर काही ठिकाणी पूजेला जाण्यासाठी मेहंदी लावण्याची ही प्रथा हौसेचा भाग म्हणून आणली आहे. तर पूर्वी नागपंचमी सणाच्या अगोदर आठ नऊ दिवस गल्लोगल्ली तील महिला एकत्र येऊन फेर धरून गाणी म्हणायच्या सोबतच झिम्मा-फुगडी, पिंगा यासारखे खेळ अगदी मनसोक्त खेळायच्या यावेळी उखाणे गाणी म्हणून मन मोकळे करायचे या दिवशी वर्तुळाकार आकार तयार करत महिला झिम्मा फुगडी सारखे खेळ खेळतात.
तसेच महिला या दिवशी नटून-थटून वारुळाला पूजनाला जातात तेथे वारुळाला दूध व लाह्याचा नैवेद्य दाखवतात.



हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या