मुख्य माहिती
📲Moto G60s हा मोटोरोलाचा स्मार्टफोन लाँच.
📲या फोनमध्ये असणार आहे ६४ मेगापिक्सल कॅमेरा.
📲तर या फोनला ब्राझीलमध्ये करण्यात आले आहे लॉन्च.
Motorola या कंपनीने त्यांचा नवा स्मार्टफोन MOTO G60s ब्राझीलमध्ये अधिकृतपणे लाँच केले आहे. नवीन मोटो जी६०एस मध्ये ६ जीबी रॅम, ६४ मेगापिक्सल क्वाड कॅमेरा सेटअप आणि १६ मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा, १२० हर्ट्ज रिफ्रेश रेटसह येणारा डिस्प्ले मिळेल. तसेच ५० वॉट चार्जिंग सपोर्ट ही मिळतो.
चला तर जाणून घेऊ moto g60s फोनच्या फीचर्स आणि किंमतीविषयी
Moto G60s: Price व उपलब्धता
ब्राझीलमध्ये Moto G60s ची २,४९९ BRL (जवळपास ३५,९०० रुपये) किंमत असून हा फोन ग्रीन आणि ब्लू रंगाच्या ऑपशन येतो.
जागतिक बाजारपेठेत हा स्मार्टफोन कधी लाँच होईल याची माहिती कंपनीने सांगितली नाही.
Moto G60s: स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स
मोटो जी६०एस या स्मार्टफोनमध्ये 6.8 inch IPS एलसीडी डिस्प्ले मिळतो, जो FullHD+ रिझॉल्यूशनसह येतो. तर स्क्रीनचा रिफ्रेश रेट १२० Hz आहे. स्मार्टफोन मध्ये ऑक्टा-कोर हीलियो G95 चिपसेट व ग्राफिक्ससाठी माली-G76 MC4 GPU आहे. मोटोच्या या स्मार्टफोनमध्ये ६ जीबी रॅम व १२८ जीबी इनबिल्ट स्टोरेज मिळते. मायक्रोएसडी कार्डद्वारे १ टीबीपर्यंत याची स्टोरेज क्षमता वाढवू शकता.
फोनमध्ये ६४ मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा आहे जो अपर्चर एफ/१.७ सोबत देण्यात आल आहे. सोबत ८ मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड कॅमेरा, ५ मेगापिक्सल Micro सेंसर आणि २ MP डेप्थ सेंसर देण्यात आला आहे. यामध्ये समोरच्या बाजूला १६ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. या स्मार्टफोनमध्ये आकर्षक फोटोज काढायला मिळतात.
मोटो जी६०एस हा स्मार्टफोन अँड्राइड 11 os सह येणार आहे. स्मार्टफोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी यात ड्यूल-सिम सपोर्ट, वाय-फाय ८०२.११ बी/जी/एन/एसी, ब्लूटूथ ५.०, GPS, ४G, यूएसबी टाइप-सी पोर्ट, NFC, ३.५ mm ऑडिओ जॅक असे फीचर्स मिळतील. फोनमध्ये पॉवरसाठी ५० वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असणार आहे. ५००० mAhची बॅटरी आहे. Side पॉवर बटनसह फिंगरप्रिंट सेंसर ही असणार आहे. सोबत वेगळे गुगल असिस्टेंट बटन मिळणार आहे. तर हँडसेटचे वजन 212 आहे.


