काय असेल राज्य सरकारचा निर्णय?
१७ ऑगस्टपासून वाजणार शाळेची घंटा…..
संपूर्ण महाराष्ट्रातील शाळा कोरोना काळामुळे गेल्या दीड -दोन
वर्षापासून बंद होत्या.
सर्व शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शहरी तसेच ग्रामीण भागातील सर्व शाळा १७ ऑगस्ट पासून सुरू करण्यात येतील अशा सूचना दिल्या गेल्या आहेत.यासंदर्भातली तारीख आधीच जाहीर झाली होती. सरकारने आता मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या आहेत.
कोरोनाची लाट (maharashtra unlcok) ओसरल्यामुळे निर्बंध शिथिल करण्यात आले आहे.त्यामुळे काही व्यवसाय, उद्योगधंदे, बाजारपेठा सुरु झाल्या आहेत.
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोना पॉझिटिव रुग्णांची संख्या आटोक्यात आली असल्याने परिस्थिती देखील सुधारत आहे, अशा ठिकाणी काही प्रमाणात शाळा सुरू कराव्यात असा विचार शालेय शिक्षण विभागाने व्यक्त केला. त्यानंतर आता ग्रामीण आणि शहरी भागात 17 तारखेपासून शाळा सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.



