Amazon

Ads Area

header ads
header ads

Vodafone-Idea ने लाँच केले २ प्लान्स, फॅमिलीतील ५ जण वापरू शकतील एकावेळी अनलिमिटेड डेटा

वोडाफोन आयडिया टेलिकॉम कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी रेड एक्स फॅमिली नावाचा प्लॅन लॉन्च केला आहे. कंपनीने फॅमिली मेंबर्सला सुविधा मिळावी म्हणून हे प्लॅन्स लॉन्च केले आहेत. इंटरनेटवर मिळालेल्या माहितीनुसार, या प्लॅनची किंमत 1699 रुपये आणि 2299 रुपये आहे तर यातील 1699 रुपयेचा प्लॅन 3 फॅमिली मेंबर्स आणि 2299 रुपयेचा प्लॅन पाच फॅमिली मेंबर्स युज करू शकतील. 



₹ 1699 Vi redx Family plan Information

या प्लॅनमध्ये एक ग्राहक आणखी दोन ग्राहकांचा किंवा लोकांचा समावेश करू शकतो म्हणजेच या पर्यायांचा वापर एकूण तीन लोक करू शकतील यामध्ये युजरला अनलिमिटेड कॉलिंग अनलिमिटेड डेट आणि महिन्याला तीन हजार एसएमएस ची सुविधा मिळणार आहे

वीआयच्या या प्लॅनमध्ये प्रायमरी मेंबर्सना एका वर्षासाठी अमेझॉन प्राईम अँपचे मेंबरशिप आणि नेटफ्लिक्स अँपचे मेंबरशिप एक वर्षासाठी आणि डिस्ने प्लस हॉटस्टार व्हीआयपी मेंबरशिप मोफत मिळेल शिवाय इंटरनॅशनल अंड डोमेस्टिक एअरपोर्ट लौन्जचा ऍक्सेस सुद्धा मिळणार आहे. सोबतच अमेरिका किंवा कॅनडामध्ये कॉल केल्यास प्रति 50 पैसे मिनिट आणि यूके साठी तीन रुपये मिनिट असे शुल्क लागणार आहे.

₹2299 Vi redx Family plan Information

या प्लॅनमध्ये 5 युजर्स असू शकणार आहेत. यातील प्रायमरी मेंबर आणखी चार युजरचा समावेश करु शकणार आहे. तर बेनिफिट्स वरील प्रमाणे समान असणार आहेत. यामध्येसुद्धा युजर्सला अनलिमिटेड कॉलिंग आणि एस एम एस ची सुविधा मिळणार आहे. सोबतच OTT अँपचे सबस्क्रीप्शन मिळणार आहे आणि आयएसडी कॉलिंग ची रेट सुद्धा कमी असणार आहेत


Vodafone-Idea चे कॉर्पोरेट प्लान
मागील महिन्यामध्ये व्ही आय कंपनी ने कार्पोरेट कस्टमर साठी चार नवीन प्लॅनची घोषणा केली होती नवीन बिजनेस प्लान ची किंमत 299 रुपये पासून सुरुवात होत होती यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग सह शंभर जीबी डेटा मिळतो. या चार प्लान्सची किंमत २९९, ३४९ रुपये, ३९९ रुपये आणि ४९९ रुपये इतकी असणार आहे.


अपग्रेड प्लॅनसमध्ये exclusive बेनिफिट्स जसे की मोबाईल सेक्युरिटी, लोकेशन ट्रॅकिंग सोल्यूशन्स, वीआय मूव्हीज आणि टीव्ही अ‍ॅक्सेससह वीआय कॉलर ट्यून्ससारखे फायदे मिळणार आहेत.
















हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या