Amazon

Ads Area

header ads
header ads

ऑलम्पिकमध्ये होणार क्रिकेटचा समावेश?

काही दिवसांपूर्वीच झालेल्या टोक्यो ओलंपिक मध्ये भारताने सर्वोत्तम कामगिरी केली. टोकियो येथील ओलंपिक भारतासाठी ऐतिहासिक झाले. या ऑलम्पिकमध्ये हॉकीमध्ये 41 वर्षानंतर पहिले पदक तसेच भालाफेक मध्ये सुवर्ण आणि इतर सात पदकांसह सर्वोत्तम कामगिरी भारताने या वेळी केली. आता आलेली बातमी ही क्रिकेट आणि भारतासाठी आनंदाची आहे.

जगातील क्रिकेटमध्ये अव्वल देशात समाजात होणाऱ्या भारतासाठी आताची ही मोठी बातमी आहे ऑलम्पिक स्पर्धेत क्रिकेटचा खेळाचा समावेश होण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. यासाठी क्रिकेटमधील जागतिक स्तरावरील सर्वोच्च संघटना आयसीसीने पुढाकार घेतलेला आहे.

ऑलिम्पिक्स क्रीडा स्पर्धेमध्ये क्रिकेटचा समावेश व्हावा यासाठी आयसीसीने एक समिती स्थापन केली आहे तर 2024 मध्ये पॅरिस येथे ऑलम्पिक स्पर्धा होईल तर त्यापुढील स्पर्धा ही अमेरिकेमधील लॉस एंजेलिस येथे होणार आहे. ही स्पर्धा 2028 या वर्षी होईल आयसीसीच्या मते 2028 च्या ऑलिंपिक स्पर्धेमध्ये क्रिकेटचा समावेश करण्याची योग्य वेळ असेल. 

महत्त्वाचे म्हणजे 2022 या वर्षी होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये क्रिकेटचा समावेश केला जाणार आहे तर आता ऑलम्पिक मध्ये देखील याचा समावेश व्हावा. या दृष्टीने प्रयत्न चालू आहेत. 1900 या वर्षी झालेल्या ऑलंपिक स्पर्धेमध्ये क्रिकेटचा समावेश होता त्यावेळी इंग्लंड आणि फ्रान्स या दोनच देशांनी यामध्ये सहभाग घेतला होता

.

अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी 'जीवन मराठी' ला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हि पोस्ट नक्की शेअर करा.

हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या