पुढील काही दिवसात अनेक नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. हा महिना नव्या मालिकांचा मांदियाळी ठरत आहे. झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांना नवीन काहीतरी देण्याचे प्रयत्न चालू आहेत. ऑगस्ट महिन्यामध्ये एक-दोन नाही तर तब्बल पाच नवीन मालिका झी मराठी या टिव्ही चैनल वर पाहता येणार आहेत आणि या सर्व मालिकांबद्दल प्रेक्षकांच्या मनात कुतूहल आहे.
पण या सर्व मालिकांच्या ट्रेलर मध्ये एक मालिकेचा ट्रेलर प्रेक्षकांना भावत आहे तो म्हणजे ती परत आली ही मालिका या मालिकेची कथा आणि आत्तापर्यंत दाखवण्यात आलेले प्रोमो यावरून प्रेक्षकांना अगदी धडकी भरली आहे. तर आता या मालिकेचा मुख्य कलाकारांच्या नावाचाही खुलासा करण्यात आला आहे.
बऱ्याच मालिकांमध्ये अभिनय करत प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारा अभिनेता स्त्रयस राजे हा या मालिकेमध्ये प्रमुख भूमिकेत असणार आहे श्रेयस हा या पूर्वी अनेक छोट्या-मोठ्या भूमिकेत दिसलेला आहे श्रेयसने यापूर्वी 'फुलाला सुगंध मातीचा' या मालिकेमध्ये देशद्रोह्याची भूमिका केली होती तर यापूर्वी 'मोलकरीण बाई' या मालिकेत सुद्धा श्रेयस झळकला होता. तसेच 'जिगरबाज', 'भेटी लागे जीवा' या मालिकांमध्ये काम केलं आहे तर 'बाबांची शाळा' या मराठी चित्रपटामध्ये श्रेयस दिसला होता.
श्रेयस प्रथमच 'ती परत आलीये' मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसणार आहे तर मालिकेच्या प्रोमो टीजर ने प्रेक्षकांची झोप उडवली असून प्रोमो मधील चेहऱ्याने 'एनाबेल' ची आठवण करून देत आहे.



