MAHA TAIT 2023 ची ऑनलाईन परीक्षा 22 फेब्रुवारी 2023 ते 3 मार्च 2023 या कालावधीत होत आहे. सर्व शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी देणाऱ्या परीक्षार्थींचे लक्ष आता निकालाकडे लागले आहे. आपल्या सर्वांना निकाल काय लागेल? याची उत्सुकता लागली आहे.
MSCE वर लागणार शिक्षक भरती परीक्षेचा निकाल यादिवशी | Maharashtra TAIT Result 2023
How to Check MAHA TAIT Result 2023?
1. आपला निकाल पाहण्यासाठी प्रथमता ऑफिशियल वेबसाईट www.mscepune.in वर जावे लागेल.
2. येथे आपल्याला शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) 2022 या टॅब वर क्लिक करावे लागेल.
3. ओपन झालेल्या टॅब वर शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) 2022 निकाल या बटनावर क्लिक करावे लागेल.
4. रिझल्ट बटणावर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला रजिस्ट्रेशन नंबर आणि डेट ऑफ बर्थ किंवा पासवर्ड टाकल्यावर आपला निकाल दिसणार आहे. (SMS आणि ईमेलच्या माध्यमातून रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड आपल्याला मिळाला आहे.)
5. आपला निकाल आता दिसेल आणि तो निकाल आपण डाऊनलोड किंवा प्रिंट करू शकतो.
What is Maha TAIT?
Maha TAIT (महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी) ही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेद्वारे आयोजित राज्यस्तरीय शिक्षक पात्रता परीक्षा आहे. महाराष्ट्र राज्यातील प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शाळांमध्ये शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांची योग्यता आणि बुद्धिमत्तेचे मूल्यांकन करण्यासाठी ही परीक्षा तयार करण्यात आली आहे.
महा TAIT परीक्षेत उत्तीर्ण झालेले उमेदवार महाराष्ट्र राज्यात अध्यापनाच्या नोकऱ्यांसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. TAIT परीक्षा 2017 ला शेवट झाली होती त्यानंतर 2023 ला होत आहे. उमेदवार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत वेबसाइटद्वारे परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. या परीक्षेद्वारे 2 लाख 39 हजार 700 उमेदवार आपले नशीब आजमावणार आहेत.


