LML Star Electric Scooter Specification
स्कूटरच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचं तर यामध्ये सगळ्यात प्रमुख 360 डिग्री कॅमेरा देण्यात आलेला आहे. या कॅमेरा मुळे आपल्याला प्रदान करण्यात आलेल्या डिस्प्ले मध्ये स्कूटर मागे येत असलेल्या वाहनांना पाहता येणार आहे.
सोबत स्कूटर मध्ये आपल्याला डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर , हील होल्ड असिस्ट रिव्हर्स पार्क असिस्ट , ABS म्हणजेच अँटी लोक ब्रेकिंग सिस्टीम मिळणार आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरचे टायर्स ट्यूबलेस असून टायर प्रेशर मॉनिटरिंग सारखी वैशिष्ट्य देखील यामध्ये उपलब्ध आहेत.
३६० डिग्री कॅमेरा असलेला हा पहिलाच इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आलेला आहे. कॅमेराचे फीचर अजून इतर कोणत्याही स्कूटर मध्ये मिळत नाहीत. लोहिया मशनरी लिमिटेड LML ने त्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये ही सुविधा दिलेली आहे त्यामुळे आता या इलेक्ट्रिक स्कूटरची स्पर्धा टीव्हीएसच्या आयक्यूब सोबत तसेच ओला S 1, बजाज चेतक आणि ओकिनावा यासारख्या इलेक्ट्रिक स्कूटर कंपन्यांसोबत असेल.
LML Star Electric Scooter Price
एल एम एल स्टार इलेक्ट्रिक स्कूटर याची किंमत साधारणता मिळालेल्या माहितीनुसार एक लाख रुपये एक शोरूम किंमत असू शकेल.


