शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेचा अभ्यास करत असताना आपल्याला भारतामधल्या नद्यांविषयी भूगोलामध्ये अभ्यास करावा लागतो. मागील भागामध्ये आपण भारतामधल्या महत्त्वाच्या नद्यांविषयी, नद्यांच्या उगम स्थानाविषयी, नद्यांच्या काठावर असलेल्या शहरांविषयी, नद्यांच्या उपनद्यांविषयी त्यांच्या वर असलेल्या धरणांविषयी माहिती बघितली.
प्रश्न: भारतातील सर्वात उंच धबधबा कोणत्या नदीवर आहे?
📝 भारतातील सर्वात उंच धबधबा जोग धबधबा हा शरावती नदीवर आहे.प्रश्न: भारतातील सर्वात उंच धबधब्याचे नाव काय?
📝 जोग धबधबा असं भारतातील सर्वात उंच धबधब्याचे नाव असून हा धबधबा शरावती नदीवर आहे.
प्रश्न: ब्रह्मपुत्रा नदीचे तिबेट मधील नाव काय?
उत्तर: ब्रह्मपुत्रा नदीला तिबेटमध्ये त्सांगपो असे नाव आहे.
प्रश्न: अरुणाचल प्रदेश मध्ये ब्रह्मपुत्रा नदीचे नाव काय आहे?
उत्तर: अरुणाचल प्रदेश मध्ये ब्रह्मपुत्रा नदीला दिहँग असं म्हटलं जातं.
प्रश्न: ब्रह्मपुत्रा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे.
उत्तर: गंगा नदीची उपनदी म्हणून ब्रह्मपुत्रा नदीला ओळखलं जातं.
प्रश्न: दामोदर खोरे प्रकल्प कोणत्या दोन राज्यांच्या विकासासाठी वरदान ठरला आहे?
उत्तर: दामोदर खोरे प्रकल्प झारखंड आणि पश्चिम बंगाल या दोन राज्यांच्या विकासासाठी वरदान आहे.
प्रश्न: भारतामध्ये किती जलसिंचन प्रकल्प आहेत.
उत्तर: भारतामध्ये 162 पेक्षा जास्त जलसिंचन प्रकल्प असल्याची माहिती मिळते.
प्रश्न: भाक्रा जलाशयाला काय म्हणतात?
भाक्रा जलाशयाचे नाव काय आहे?
उत्तर: गोविंद सागर असे भाकरा जलाशयाचे नाव आहे?
प्रश्न: भाक्रा धरणाची उंची किती आहे?
उत्तर: भाकरा धरणाची उंची 226 मीटर इतकी आहे.
प्रश्न: इंदिरा गांधी कालवा कोणत्या धरणातून काढण्यात आला आहे?
उत्तर: हरिके धरणातून इंदिरा गांधी कालवा काढण्यात आलेला आहे.
प्रश्न: भारतातील सर्वाधिक लांबीचा कालवा कोणता आहे?
उत्तर: इंदिरा गांधी कालवा हा भारतातील सर्वाधिक लांबीचा कालवा आहे.
प्रश्न: गंगा नदीची सर्वाधिक लांब उपनदी कोणती आहे?
उत्तर: यमुना नदी ही गंगा नदीची सर्वाधिक लांब उपनदी आहे.
प्रश्न: साबरमती नदी अरबी समुद्राला कोठे मिळते?
उत्तर: खंबातच्या आखातामध्ये साबरमती नदी अरबी समुद्राला मिळते.
प्रश्न: भागीरथी(गंगा) नदीवरील कोणता प्रकल्प वादग्रस्त आहे?
उत्तर: भागीरथी नदीवरील तिहरी प्रकल्प हा वादग्रस्त प्रकल्प आहे.
प्रश्न: भाक्रा नांगल प्रकल्प कोणत्या नदीवर आहे?
उत्तर भाक्रा नांगल प्रकल्प सतलज नदीवर आहे.
प्रश्न: भाक्रा धरण कोणत्या राज्यात आहे?
उत्तर: भाकरा धरण हिमाचल प्रदेश राज्य मध्ये आहे.
प्रश्न: नांगल धरण कोणत्या राज्यात आहे?
उत्तर: नांगल धरण पंजाब राज्यामध्ये आहे.
प्रश्न: कोणत्या विद्युत प्रकल्पासाठी भारत भूतान ला मदत करत आहे?
उत्तर: ताला जलविद्युत प्रकल्पासाठी भारत भूतानला मदत करत आहे.
प्रश्न: नेपाळ आणि बिहार यांच्यात कोणता प्रकल्प संयुक्त प्रकल्प आहे?
उत्तर: कोसी प्रकल्प हा बिहार आणि नेपाळ यांच्यामध्ये संयुक्त प्रकल्प आहे.
प्रश्न: सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये संयुक्त प्रकल्प आहे.
उत्तर: मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात या राज्यामध्ये सरदार सरोवर प्रकल्प संयुक्त प्रकल्प आहे.
प्रश्न: केरळ मधील कुंतीपुझा नदीवरील कोणता प्रकल्प वादग्रस्त प्रकल्प आहे?
उत्तर: सायलेंट व्हॅली प्रकल्प हा कुंतीपूझा नदीवरील केरळमधील वादग्रस्त प्रकल्प आहे.
प्रश्न: चिनाब नदीवरील कोणता प्रकल्प वादग्रस्त प्रकल्प आहे?
उत्तर: बागलीहारा प्रकल्प हा भारत पाकिस्तान भागातील वादग्रस्त प्रकल्प असून तो चिनाब नदीवर आहे.
प्रश्न: अमेरिकेतील प्रसिद्ध टेन्शन व्हॅली प्रकल्पाच्या धर्तीवर कोणते प्रकल्प भारतामध्ये आहे?
उत्तर: दामोदर खोरे प्रकल्प हे प्रकल्प अमेरिकेतील प्रसिद्ध टेनसी व्हॅली प्रकल्पाच्या धर्तीवर भारतात बनवलेले आहे.
प्रश्न: आंध्र प्रदेश आणि ओडिसा राज्याचा संयुक्त प्रकल्प कोणता आहे?
उत्तर: मुचकुंद प्रकल्प हा आंध्र प्रदेश आणि ओडिसा राज्याचा संयुक्त प्रकल्प आहे.
प्रश्न: अहमदाबाद हे शहर कोणत्या नदीच्या काठी आहे?
उत्तर: अहमदाबाद शहर साबरमती नदीच्या वसलेल आहे.
प्रश्न: भारतामधील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे?
उत्तर: नर्मदा नदी ही भारतामधील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी आहे.
प्रश्न: कोणती नदी वारंवार पात्र बदलते?
उत्तर: कोसी ही नदी वारंवार पात्र बदलते. त्यामुळे या नदीला खट्याळ नदी असं देखील म्हटलं जातं.
प्रश्न: तुलबुल हा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे?
उत्तर: तुलबुल हा प्रकल्प झेलम नदीवर आहे.
प्रश्न: झेलम नदीच्या पात्रामध्ये कोणती सरोवरे आहेत?
उत्तर: झेलम नदीच्या पात्रामध्ये दाल व वूलर ही सरोवरे आहेत.


