पंढरपूरमध्ये ऊस दरवाढीच्या मागणीसाठी अनेक शेतकरी संघटना आंदोलन करत आहेत. मात्र या आंदोलनाला बुधवारी रात्री हिंसक वळण लागले आहे.
पुणे-पंढरपूर रस्त्यावरच्या वाखरी येथे ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचे टायर फोडण्यात आले आहेत.
शेतकरी संघटनांनी ऊसास 3100 रुपये प्रतिटन दर आणि 2500 रुपये पहिली उचल देण्याची मागणी केली आहे.


