गुजरात राज्यातील सुरत जिल्ह्यात मांडवी तालुक्यात अरेथ गावात वरातीत मित्रांसोबत DJ च्या तालावर नाचत असताना अचानक हृदय विकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हृदय विकाराचा झटका आल्याचे कुटुंबातील सदस्यांना लक्षात आल्यावर त्यांनी नवरदेवाला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. हॉस्पिटल मध्ये डॉक्टरनी मृत घोषित केले.
नवरदेवाचे नाव मितेश चौधरी असून त्याच वय केवळ 33 वर्ष होत. लग्नाची वरात बालोद तालुक्यात असणाऱ्या धामडला गावात जाणार होती. वरात निघत असताना काही विधी पूर्ण करत वरात निघणार होती मित्रांना नाचताना पाहून मी त्यालाही नाचण्याची इच्छा झाली. त्यामुळे तो डीजे जवळ जाऊन नाचू लागला नाचत असलेल्या नवरदेवाला मित्रांनी खांद्यावर उचलून घेतलं. त्यानंतर अचानक त्याच्या छातीत दुखू लागलं. कुटुंबीयांच्या लक्षात आल्यावर मितेश ला मोटरसायकलवरून स्थानिक रुग्णालयात नेण्यात आलं मात्र डॉक्टरांनी मोठ्या हॉस्पिटलला घेऊन जाण्याचा सल्ला दिला बारडोली येथील शासकीय रुग्णालयात रुग्णवाहिकेतून नेण्यात आले.मात्र तेथील डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


