आज 8 मे रोजी जगात जागतिक मातृदिन मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. आपण आईवर कायम प्रेम करत असतोच मात्र जगाने मे महिन्यातील दुसऱ्या रविवारी (Mother's Day Date) हा दिवस ठरवला आहे. कारण आपण रोज व्यक्त करत नसलो तरी आजचा एक दिवस व्यक्त करता यावा म्हणून. मराठी कवी फ. मु. शिंदे यांनी त्यांच्या आई कवितेत आईच ममत्व सांगताना ' आई एक नाव असत, घरातल्याघरात गजबजलेलं गाव असतं. अस आईच महत्व आणि ममत्व अधोरेखित केलं आहे. चला आता जाणून घेऊ मातृदिन साजरा करण्यामागील इतिहास आणि महत्व.
जागतिक मातृदिनाचा इतिहास (History of World Mother's Day)
मातृदिनाची सुरवात अमेरिकेत करण्यात आली. अॅक्टिविस्त अना जार्विस यांचं त्यांच्या आईवर खूप प्रेम होत. त्या स्वतः लग्न न करता आयुष्यभर आईसोबत राहिल्या. आईच्या मृत्यूनंतर आईच्या स्मृतिप्रित्यर्थ स्मारक बांधले. तेथूनच अनेक देशात मातृदिन साजरा करण्यास सुरुवात करण्यात आली.
जागतिक मातृदिन कधी असतो?
प्रथम मदर्स डे साजरा करण्यासाठी विशिष्ट अशी तारीख ठरली नव्हती. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष वूड्रो विल्सन यांनी 10 मे 1914 ला (International Mother's Day Date 2022) कायदा पास करत ेेेे मे महिन्याच्या दुसर्या रविवारी मातृदिन साजरा करण्यात यावा असं म्हटलं तेव्हापासून मातृदिन (Mother's Day) हा मे महिन्याच्या दुसर्या रविवारी साजरा केला जातो.
मातृदिनाचे महत्त्व काय आहे? What is the significance of Mother's Day?
प्रेम व्यक्त करण्यासाठी खरंच का असा खास कोणता दिवस नसतो प्रत्येक दिवशी प्रत्येक जण आईला खुश ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. मात्र मातृदिन असल्यामुळे व्यक्त करण्यासाठी खास दिवस असल्यामुळे बरेच जण या दिवशी आपल्या आईला छान छान भेटवस्तू देतात कामात मदत करतात. काळजी घेऊन बाहेर फिरायला घेऊन जातात. थोडक्यात या दिवशी आईला खुश ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न केला जातो.
Mother's day Google Doodle
लोकप्रिय सर्च इंजिन गुगल या कंपनीने सुद्धा आपले ठेवत मातृदिन साजरा केला आहे. आईच महत्व, माया, प्रेम अधोरेखित करण्यासाठी गुगलने हा डूडल ठेवला आहे.
Mother's day 2022 Marathi Quotes:
जागतिक मातृदिन शुभेच्छा


