राजर्षी शाहू महाराजांच्या निधनास आज 100 वर्ष पूर्ण झाली असून त्या निमत्तानं कोल्हापूर सह संपूर्ण राज्यात 100 सेकंद स्तब्ध राहून मानवंदना देण्यात यावी, अस प्रशासनाने आवाहन केलं होत. कोल्हापुरात दसरा चौक ते शाहू महाराज समाधी स्थळ इथपर्यंत कँडल मार्च काढण्यात आले.
कोल्हापूर शहर तसेच गावागावात असणाऱ्या नागरिकांनी शाहू महाराजांना आदरांजली अर्पण केली. महाराजांच्या कार्यावर आधारित व्याख्यानं, फुटबॉल स्पर्धा आणि कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. राजर्षी शाहू महाराजांबद्दल असणारी प्रेम आणि कृतज्ञता यावरून अधोरेखित होते.
कोल्हापूर येथे शाहू समाधी स्थळ येथे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत तसेच खासदार छत्रपती संभाजी राजे अभिवादन करण्यास उपस्थित होते.
राजर्षी शाहू महाराज यांच्या विषयी माहिती
राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म कोल्हापुरात 26 जून 1874 रोजी झाला होता. महाराजांनी गरीब, दीन दुबळ्या लोकांना आपलस करत त्यांच्यासाठी आपल आयुष्य वाहून घेतलं. त्यांनी केलेल्या कार्याला उजाळा देण्यासाठी विविध प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येते. तर शाहू महाराजांचा मृत्यू वयाच्या 47व्या वर्षी 6 मे 1922 ला मुंबई येथे झाला होता.


