प्रसिध्द बॉलीवूड अभिनेता शाहीद कपूर याची प्रमुख भुमिका असलेल्या 'कबीर सिंह' या चित्रपटाचा सिक्वल येणार आहे.
कबीर सिंह सोबत 'आशिकी 2' आणि 'भूल भुलैया 2' या चित्रपटांचा ही सिक्वेल येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. निर्माता मुराद खेतानी यांनी अधिकृत घोषणा वेळ आल्यावर करू असे सांगितले.
तर 'कबीर सिंह' या चित्रपटाने 250 कोटी रूपयांहून अधिक कमाई केली होती. 'कबीर सिंह' हा 'अर्जुन रेड्डी' (Arjun Reddy) या दाक्षिणात्य सिनेमाचा रिमेक आहे.


