प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार याचा बहुचर्चित चित्रपट पृथ्वीराजचं नाव आता बदलण्यात आलं आहे.
आता या चित्रपटाचं नवीन नाव 'सम्राट पृथ्वीराज' असं असणार आहे. चित्रपट नाव बदला प्रकरणी करणी सेनेनं कोर्टामध्ये धाव घेतल्यानंतर निर्मात्यांनी चित्रपटाचं नाव बदलल्याची माहिती मिळत आहे.
जून महिन्यातील ३ तारखेला अक्षयचा हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे.
पहा व्हिडिओ:
या चित्रपटात घोरच्या मुहम्मदशी सामना करताना पृथ्वीराज चौहानची वीरता दाखवण्यात येणार आहे. चित्रपटात अक्षय कुमार सोबत संजय दत्त, सोनू सूद, मानुषी छिल्लर यांच्याही भूमिका आहेत.


