ट्रेलर लॉंचचा कार्यक्रम कलाकारांच्या उपस्थितीत
ट्रेलर लॉंच करत असताना अभिनेता रोहन पाटील, नितीश चव्हाण, अभिनेत्री श्वेतलाना अहिरे, दिग्दर्शक शिवाजी दोलताडे आणि निर्माते गोवर्धन दोलताडे आदी मान्यवर उपस्थित होते. तर सिनेमात आपल्याला फाईट, एक्शन, रोमान्स आणि लव्हस्टोरी पाहायला मिळणार आहे. या सिनेमाच्या ट्रेलरला युट्यूब रिलीज केल्यानंतर प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देत आहेत त्यामुळे प्रेक्षकांच्यात सिनेमाची उत्सुकता लागून राहिली आहे.
मजनू मराठी सिनेमाचे निर्माते गोवर्धन दोलताडे म्हणाले, "प्रेमाची अनोखी परिभाषा सांगणारा हा मजनू चित्रपट येत्या 10 जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. कुटुंबातील सर्वांनी एकत्र हा सिनेमा बघावा". Indian idol फेम सलमान अलीने या सिनेमाचं पार्श्वगायन केलं आहे.
ट्रेलर लाँच वेळी दिग्दर्शक शिवाजी दोलताडे म्हणाले, सिनेसृष्टीच्या इतिहासामध्ये प्रथमचं 3 हजार फुटाच्या उंचीवर जात मजनू सिनेमाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. याच उंचीप्रमाणे मराठी सिनेमा जागतिक स्तरावर मला घेऊन जायचा आहे. प्रत्येक जण कॉलेजला गेल्या नंतर स्वतःला मजनू समजतो जे प्रेक्षक हा चित्रपट पाहतील. त्यांना त्यांच्या कॉलजमधील दिवसांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही.
सलमान अलीने केले पार्श्वगायन
इंडीयन आयडॉल फेम सलमान अलीने केले पार्श्वगायन
इंडियन idol या शोतून प्रत्येक घरात पोहचलेला आणि 10 व्या सीझनचा विजेता पार्श्वगायक सलमान अलीने 'मजनू' या मराठी चित्रपटासाठी पार्श्वगायन केले असून तो पहिल्यांदाच मराठीत गातो आहे. मजनू सिनेमासाठी गाण्याचा अनुभव खूप छान होता. माझी जन्मभूमी हरियाणा असली तरी कर्मभूमी महाराष्ट्र आहे. बऱ्याच वर्षांपासून मुंबईमध्ये वास्तव्य असल्याने मराठी भाषेची गोडी लागली. मराठी सिनेमात मला गायची इच्छा होती ती मजनू सिनेमामुळे माझी पूर्ण झाली, 'असे सलमान अलीन यावेळी आवर्जून सांगितल आहे.
अभिनेता रोहन पाटील, लागिर झालं जी फेम नितीश चव्हाण, अभिनेत्री श्वेतलाना अहिरे यांच्या प्रमुख भूमिका या चित्रपटात आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन दिग्दर्शक शिवाजी दोलताडे यांनी केलंय.


