Amazon

Ads Area

header ads
header ads

Gama Pehlwan Google Doodle: आज गूगलचं डूडल गामा पहिलवान यांना समर्पित!

Gama Pehalwan: 'मोठा गामा पैलवान होत आहे'.  एके काळी असा वाक्यप्रचार कोणत्याही व्यक्तीची शक्ती सांगण्यासाठी वापरला जात असायचा. गामा पैलवान हे नाव प्रत्येक घरात गुंजत असायचे.  त्याच गामा पैलवानांचा आज 144 वी जयंती आहे.  
कुस्ती जगतात गामा कुस्तीपटूचा मान किती मोठा होता, याचा अंदाज गुगलनेही त्यांच्या वाढदिवसानिमित्त डूडल बनवून त्यांचा गौरव केला आहे, यावरूनच लावता येतो. ( गामा पेहलवान गुगल डुडल ) 22 मे 1878 रोजी अमृतसरच्या जब्बोवाल गावात द ग्रेट गामा किंवा गामा पहेलवान यांचा जन्म झाला. ते काश्मिरी कुटुंबातून आले होते आणि त्यांचे वडील मुहम्मद अझीझ बक्श दतियाचे (Ghulam Mohammad Baksh Butt)तत्कालीन महाराजा भवानी सिंग यांच्या दरबारात कुस्ती खेळत असत.

गामा पेहलवान  (The Great Gama) माहिती
 
गामा पैलवान ६ वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. पण इकडे गामा यांचे कुस्तीपटू बनणे सुरू झाले होते. वडिलांंच्या निधनानंतर गामा पैलवान यांचे आजोबा नून पैलवान यांनी त्यांना व त्यांच्या भावाला कुस्तीच्या युक्त्या शिकवण्याची जबाबदारी घेतली. यानंतर मामा इडा पैलवान यांनी गामा आणि त्याच्या भावालाही शिकवले. 1888 मध्ये गामा पैलवान 10 वर्षांचा असताना पहिल्यांदा जगाच्या नजरेत आला होते. 
नंतर जोधपूरमध्ये सर्वात ताकदवान व्यक्ती शोधण्यासाठी स्पर्धा घेण्यात आली होती. यामध्ये 400 हून अधिक पैलवानांनी भाग घेतला होता आणि गामा यात शेवटच्या 15 मध्ये होते.

एवढ्या लहान वयात गामा यांची ताकद पाहून जोधपूरचे महाराज थक्क झाले. या कारणास्तव त्यांनी गामा यांना विजयी घोषित केले. यानंतर वडिलांप्रमाणे गामानेही दतिया महाराजांच्या दरबारात कुस्ती खेळण्यास सुरुवात केली.
गामा कठोर सराव करायचे
( gama Pehalwan workout and diet )

लहान वयातच गामाचे नाव सर्वत्र प्रसिद्ध झाले. ते दिवसातून 10 तासांपेक्षा जास्त सराव करायचे आणि ताकद वाढवण्यासाठी आखाड्यात एका दिवसामध्ये 40 पैलवानांशी कुस्ती करत असत. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, दररोज 5 हजार बैठका आणि 3 हजार दंड मारायचे.
त्यांचा खुराक रोज 6 देशी कोंबड्या, 10 लिटर दूध, अर्धा लिटर तूप, दीड लिटर लोणी, बदामाचे सरबत आणि 100 रोट्या खात असे.


गामा पहेलवान यांची कारकीर्द
( Gama Pehlwan information in Marathi )

गामा पहेलवान आपल्या ५ दशकांच्या कुस्ती कारकिर्दीत अपराजित राहिले.  वयाच्या 10 व्या वर्षापासून त्याने आखाड्यात डाव पेच लावायला सुरुवात केली आणि त्यानंतर ते ज्याच्याविरुद्ध कुस्ती खेळले ते जिंकले.
त्यांनी केवळ भारतातच नव्हे तर जगभरातील लोकांना प्रेरणा दिली. त्यात ब्रूस लीसारख्या दिग्गजांचा समावेश आहे. 1910 मध्ये ते लंडनला गेले. तेव्हा गामा यांनी खुले आव्हान दिले होते, कोणत्याही वजन गटातील तीन पैलवानांना फक्त ३० मिनिटांत पराभूत करू.बराच काळ गामा पैलवान यांचे आव्हान कोणीही स्वीकारले नाही.
अशा स्थितीत गामा यांनी हेवीवेट कुस्तीपटूंना आव्हान दिले होते.  ते विश्वविजेता स्टॅनिस्लॉस जाविस्को, फ्रँक गॉच यांना आव्हान दिले की एकतर त्यांना पराभूत करावे किंवा त्यांना मिळालेल्या बक्षिसाच्या रकमेसह घरी परतावे.
Gama Pehlwan Google Doodle
गामा यांचे आव्हान स्वीकारणारा पहिला कुस्तीपटू अमेपिकाचा बेंजामिन रोलर होता. गामाने पहिल्या वेळी 1 मिनिट 40 सेकंदात आणि दुसऱ्या वेळी
 9 मिनिटे 10 सेकंदात रोलर ला चीत केलं. दुसऱ्या दिवशी त्यांनी आणखी 12 पैलवानांचा पराभव केला होता. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. भारतामध्ये परतल्यावर ५ फूट ८ इंच उंचीचे गामा पैलवान रुस्तम-ए-हिंदही झाले होते.

ही माहिती कशी वाटली नक्की कळवा.
( Gama Pehlwan Google Doodle )

हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या