Amazon

Ads Area

header ads
header ads

शेतकऱ्याच्या नातीच जंगी स्वागत | पहा कस केलय Farmer hired Helicopter

सध्या इंटरनेटवर एका नवजात मुलीचा हेलिकॉप्टर मधून घरी येतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. सदर व्हिडिओ बद्दल माहिती घेतली असता हा व्हिडिओ पुणे येथील बालेवाडी परिसरात राहणाऱ्या बालवडकर कुठुंबचा असल्याचं कळलं. बालवडकर कुटुंबात अलीकडेच कृषिका या कन्येचा जन्म झाला असून तिच्या जन्माने बालवडकर कुटुंबात आनंदाचे वातावरण असून त्यांनी या मुलीला घरी आणण्यासाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था केली असल्याचे समजते.
विदर्भातील असलेले हे कुटुंबाचा व्यवसाय शेती असून सध्या महाराष्ट्रातील विदर्भात शेतकऱ्यांची स्थिती अत्यंत वाईट असल्याचं चित्र आहे. या भागातील शेतकरी वर्गाच्या सतत आत्महत्येच्या बातम्या आपण ऐकला असालच मात्र ही बातमी आपल्याला आश्चर्याचा सुखद धक्का देत असून बालवडकर कुटुंबाने केलेले हे काम खरच आनंद देणारे आहे.

पुण्यातील बालेवाडी परिसरात राहणाऱ्या अजित पांडुरंग बालवडकर यांना विचारल्यास त्यांना त्यांच्या नातीचे म्हणजेच कृषिकाचे जंगी स्वागत करायचे होते. असे सांगितले. मुलगा किंवा मुलगी अस भेदभाव न करता बालवडकर कुटुंबाने केलेले नातीचे स्वागत हे कौतुकास्पद असून  नात हीच आमच्या वंशाचा दिवा असल्याचे त्यांनी सांगितल आहे.(Farmer hired helicopter for newborn granddaughter)

आपल्याला जर ही बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा. आणि आमच्या जिवन मराठी सोशल मीडियावर फॉलो करायला विसरू नका.
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
याबद्दल अधिक वाचा👉
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या