Amazon

Ads Area

header ads
header ads

xiaomi 12 Series: 12GB RAM सह 120 W फास्ट चार्जिंग सपोर्ट. iPhone ला सुद्धा मागे टाकले या स्मार्टफोनने

Xiaomi कंपनी मागील काही दिवसांपासून १२ सिरीज वर काम करत होती. या सिरीज अंतर्गत xiaomi 12, xiaomi 12 pro , xiaomi 12X हे स्मार्टफोन्स लॉन्च करण्यात येणार आहे. कंपनीने या सीरिजमध्ये खूप मेहनत घेऊन नवीन फीचर्स ग्राहकांसाठी आणले आहेत.


Xiaomi 12 Pro features : 
Xiaomi 12 Pro हा स्मार्टफोन अँड्रॉइड  १२ ओएस वर आधारित असलेल्या मीयुआय १२ वर चालतो. हा Qualcomm Snapdragon 8 जेन 1 चिपसेट सह समर्थीत आहे . 
या स्मार्टफोनमध्ये 3200 × 1440 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.73 इंचाचा  डिस्प्ले दिला आहे.

Camera Feature :

Xiaomi 12 सिरीज मधल्या स्मार्टफोन्स मध्ये भन्नाट कॅमेरा फीचर्स प्रोव्हाइड केले गेले आहेत.
Xiaomi 12 Pro मध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. यामध्ये 50 मेगापिक्सल सोनी आईएमएक्स707 7पी लेन्स  आहे. तसेच 50 मेगापिक्सलची टेलीफोटो लेन्स असलेला सेंसर आणि 50 मेगापिक्सलचाची अल्ट्रा वाईड अँगल सेंसर ग्राहकांना मिळणार आहे. सेल्फी कॅमेरा बद्दल बोलायचे तर 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेरा दिला जाणार आहे.

शाओमीच्या या फोनमध्ये  12 जीबी पर्यंतच्या रॅम आणि 256 जीबी स्टोरेज देण्यात येणार आहे. 

शाओमी ने ग्राहकांना या स्मार्टफोन बद्दल एक महत्त्वाचा दावा केला आहे,  फक्त १५ मिनिटांमध्ये ० ते १०० चार्जिंग होईल असे कंपनीचे मत आहे. म्हणजेच या फोनमध्ये  4,600 एमएएच बॅटरी आहे,जी  120वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.


Xiaomi 12 Pro ची किंमत ( price in India ) :
  हा स्मार्टफोन चीनमध्ये लॉन्च झाला असून स्टोरेज प्रमाणे वेगवेगळ्या किंमतीत हा ग्राहकांना विकला जात आहे. 
 Xiaomi 12 pro 8GB/ 128 GB या स्मार्टफोन ची किंमत 55,000 असे आहे. तर Xiaomi 12 pro ज्यामध्ये 8GB/ 256 GB स्टोरेज असेल तो ग्राहकांना 58,600  रुपयांपर्यंत मिळू शकतो. 
Xiaomi 12 pro 12GB/  256GB  या स्मार्टफोन ची किंमत 63,290 असे आहे.
हा लेख नक्की सोशल मीडियावर शेअर करा. जीवन मराठीला Facebook, Instagram, YouTube वर फॉलो करा. WhatsApp Group ला जॉईन होऊन ताजे अपडेट्स लगेच मिळावा.
header ads

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

हे देखील वाचा

amazon ads