अवघ्या काही दिवसात ग्राहकांच्या पसंतीस ठरलेले Realmi या स्मार्टफोन तयार करणाऱ्या कंपनीने त्यांचा नवा स्मार्टफोन लॉन्च करणार असल्याचे समजले आहे.
परंतु लॉंचिंग आधीच या स्मार्टफोनचे डिझाईन आणि स्पेसिफिकेशन्स लीक झाले आहेत. या स्मार्टफोन चे फीचर्स पाहता कंपनीने यामध्ये अनेक नवीन टूल्स ॲड केले आहेत.
Realmi 9i Specifications :
Realmi या कंपनीने त्यांच्या नवीन येणाऱ्या स्मार्टफोनमध्ये मागील बाजूस एलईडी फ्लॅश लाईट सोबत ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. ज्यामध्ये ६४ मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा तसेच ८ मेगापिक्सेलचा सेंसर आणि २ मेगापिक्सेलचा सेंसर मिळू शकतो. कदाचित फ्रंट कॅमेरा हा ३२ मेगापिक्सेलचा असेल.
हा स्मार्टफोन Android ११ बेस Realmi UI वर काम करेल. या फोनचा चार्जिंग सपोर्ट पाहता, पावर बॅकअप साठी 500 mAh बॅटरी प्रोव्हाइड केली जाऊ शकते.
फोन मध्ये ६.५ इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले असू शकतो.
रियलमी चा हा स्मार्टफोन MediaTek Helio G90T या सुपर फास्ट प्रोसेसर वर समर्थीत आहे. या स्मार्टफोनमध्ये 8GB RAM आणि 128GB इंटरनल स्टोरेज दिला जाऊ शकतो परंतु कंपनी यापेक्षा जास्त इंटरनल स्टोरेज प्रोव्हाइड करू शकते अशी शक्यता आहे.
सध्या कंपनी Realmi 9 Series डेव्हलप करत आहे त्यामुळे पुढच्या वर्षी या सिरीज मधील नवनवीन स्मार्टफोन लॉन्च होऊ शकतात. त्यामध्ये Realmi 9, Realmi 9 pro, Realmi 9 pro+ या सारखे मॉडेल्स ग्राहकांसाठी उपलब्ध केले जाऊ शकतात.


