काही दिवसांपासून विकी कौशल आणि कटरीना यांच्या रिलेशन बद्दल बातम्या व्हायरल होत होत्या. परंतु कटरीनाने याबद्दल कोणताही गाजावाजा न करता थेट लग्न करूनच चाहत्यांना मोठा धक्का दिला.
कटरीनाच्या लग्नाच्या बातम्या संपतात नवीन एका जोडप्याबद्दल बातमी समोर आली आहे. ही बातमी नेटकर्यांना गोंधळात टाकून खुपच व्हायरल होत आहे.
कबीर सिंग मधील प्रीती आणि शेरशहा मधील डिंपल म्हणजेच कियारा अडवाणी ही सुद्धा आता लवकरच लग्न करणार आहे. पण तिचा रियल हिरो कोण?
शेरशहा या सिनेमातील डिंपल आणि विक्रम यांची जोडी चाहत्यांना अगदी वेड लावून टाकणारी ठरली आहे. या सिनेमानंतर प्रेक्षकांना सुद्धा कियारा आणि सिद्धार्थ एकमेकांसाठी योग्य आहेत असे वाटू लागले आहे. प्रेक्षकांनाच नव्हे तर या दोघांमध्ये सुद्धा अगदी चांगलीच केमिस्ट्री बनली आहे. ते दोघे खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. अशी बातमी वायरल झाली आहे. ते दोघे एकमेकांसोबत असताना खूपच कंफर्टेबल फील करतात असेही मुलाखतीद्वारे समोर आले आहे. परंतु त्या दोघांनी त्यांच्या रिलेशनशिप बद्दल कोणतीच गोष्ट चाहत्यांना कबूल केली नाही.
कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा लवकरच लग्न करतील अशी शक्यता दर्शवली जात आहे.
ही बातमी खरी आहे की अफवा हे येणाऱ्या काही दिवसात कळेलच.


